Pune Crime | SUV कारचा अपहार करणाऱ्या दोघांना बंडगार्डन पोलिसांकडून गोव्यातून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भाड्याने कार (Rent a car) घेऊन फरार झालेल्या दोघांना पुण्यातील (Pune Crime) बंडगार्डन पोलिसांनी (Bundgarden Police) गोव्यातून (Goa) अटक केली आहे. कार भाड्याने घेताना आरोपींनी त्यांची खरी ओळख लपवून खोटे नवा व पत्ता दिला होता. हा प्रकार 19 जानेवारी रोजी उघडकीस आला होता. हमीद बावर उर्फ छेदीखान Hamid Bawar alias Chhedi Khan (वय-40 रा. कोडलीम अंगडी, गोवा), अविनाश कुमार प्रेमचंद यादव Avinash Kumar Premchand Yadav (वय-32 रा. कोलवा, गोवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

याबाबत मच्छिंद्र विश्वनाथ दराडे Machhindra Vishwanath Darade (रा. लोकमान्य कॉलनी, कोथरुड) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा सेल्फ ड्राईव्हचा व्यवसाय (Self Drive Business) असून त्याकरिता त्यांनी ग्रहकांसाठी simpledrive.in या नावाने वेबसाईट सुरु केली आहे. 14 जानेवारी रोजी त्यांना वत्सल पटेल (Vatsal Patel) नावाच्या ग्राहकाने संपर्क साधून 7 सीटर कारची मागणी केली. (Pune Crime)

 

त्यानंतर 7 हजार रुपये अमानत रक्कम (Deposit Amount) घेऊन एका दिवसाचे 12 ठरवून फिर्यादी यांनी महिंद्रा एसयुव्ही कार SUV Car (एमएच 12 पी झेड 8326) वत्सल पटेल व त्यांचे मित्र श्रीहरी (रा. गुजरात Gujarat) जिजेश (रा. केरळ Kerala) यांना दिली. ही कार 19 जानेवारी रोजी परत करण्याचे ठरले होते. फिर्यादी यांनी 24 जानेवारीपर्यंत वाट पाहिली. दरम्यान त्यांनी कार घेऊन जाणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधला असता तो क्रमांक बंद लागला. यानंतर फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत बंडगार्डन पोलिसांनी आरोपींच्या मोबाईल फोन ट्रॅक केला. त्यावेळी आरोपी चार दिवसांपासून गोवा या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या एका पथकाने गोवा येथे जाऊन फिर्य़ादी यांच्या कारसह दोघांना ताब्यात घेतले. आरोपींनी कार भाड्याने घेताना त्यांची नावे व पत्ते खोटे सांगितले होते.

 

ही कारवाई ही कारवाई  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Joint Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील (DCP Sagar Patil),
सहायक पोलीस आयुक्त यशवंत गवारी (ACP Yashwant Gawri),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर (Senior Police Inspector Pratap Mankar),
पोलीस निरीक्षक गुन्हे अश्विनी सातपुते (Police Inspector Ashwini Satpute)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार (PSI Rahul Pawar),
पोलीस अंमलदार सुधीर घोटकुले, सागर घोरपडे, सचिन भिंगारदिवे, किरण तळेकर यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Bundgarden police arrest two criminals for hijacking SUV in Goa

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Indian E-Passports | भारतीय नागरिकांना मिळणार E-Passports ! जाणून घ्या काय आहे हे आणि कसे करणार काम

Aadhaar Update | ‘वन नेशन वन रजिस्ट्रेशन’ अंतर्गत आता जमीनीचा सुद्धा असेल ‘आधार’ नंबर, जाणून घ्या काय होतील फायदे

SBI Online Transaction | ‘एसबीआय’ बँकेने केला मोठा बदल ! ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका, जाणून घ्या