Pune Crime | गुंड निलेश वाडकर याच्या बायकोविरुद्ध गुन्हा दाखल; तरुणाचे अपहरण करुन जीवे मारण्याचा केला प्रयत्न

पुणे : Pune Crime | भिशीतील व्यवहाराच्या कारणावरुन तरुणाला बोलावून घेऊन त्याचे अपहरण (Kidnapping Case) करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुंड निलेश वाडकर (Gangster Nilesh Wadkar) याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी विनायक तानाजी लोंढे Vinayak Tanaji Londhe (वय ३०, रा. रामटेकडी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station ) फिर्याद (गु. रजि. नं. ७५८/२२) दिली आहे. त्यानुसार गुंड निलेश वाडकर याच्या बायकोविरुद्ध आणि तिच्या तीन साथीदारांवर खूनाचा प्रयत्न (Attempt To Kill) केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश वाडकर याची जनता वसाहतीमध्ये दहशत होती. टोळी युद्धामध्ये त्याचा गुंड चॉकलेट सुन्या व त्याच्या साथीदारांनी खून केला होता. त्यानंतर त्याचा मुलगा नवनाथ वाडकर (Navnath Wadkar) हा भाई बनून परिसरात दहशत पसरवित आहे. आता वाडकर याच्या पत्नीवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना आंबेगावातील स्वामी नारायण मंदिर येथील चौपाटीवरील हॉटेल समोर ते कात्रज जुना बोगद्याकडे जाणार्‍या रोडवर शनिवारी सायंकाळी साडेसहा ते रात्री दहा वाजेच्या दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंड निलेश वाडकर याच्या बायकोने फिर्यादीसोबत व्हॉटसअ‍ॅप चॅटीग करुन त्यांना स्वामी नारायण मंदिराजवळ बोलावून घेतले.
ते तेथे आले असताना त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating)
करुन हत्याराचा धाक दाखविला. जबरदस्तीने गाडीवर बसवून मुंबई बंगलोर महामार्गाने
(Mumbai Bangalore Highway) जुना कात्रज बोगद्यापासून (Old Katraj Tunnel) आडबाजूला घेऊन गेले.
तेथे गुंड निलेश वाडकर याच्या बायकोच्या साथीदारांनी “तुला बायकांना फसवायला पाहिजे, थांब तुझ्या गुप्तांगाची कातडी काढून टाकतो,”
असे म्हणून हत्यार फिर्यादीच्या डोक्यात मारुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
तसेच संपवून टाकण्याची धमकी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक कर्चे (Sub-Inspector of Police Karche) तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime | Case filed against gangster Nilesh Wadkar’s wife; They tried to kidnap and kill the young man

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड आमदारकीचा राजीनामा देणार; ‘या’ कारणामुळे केली घोषणा, जाणून घ्या नेमकं काय घडलं

MP Supriya Sule | ‘… त्याशिवाय बातमी होत नाही ना’; सुप्रिया सुळेंचा गजानन कीर्तिकरांना टोला