Pune Crime | पोलीस असल्याची बतावणी करीत ज्येष्ठ नागरिकाला लुबाडले

पुणे : Pune Crime | पुढे चेकिंग चालू आहे, तुमच्या गळ्यातील दागिने काढून ठेवा, असे सांगून हालचलाखीने दोघा तोतया पोलिसांनी एका ज्येष्ठ नागरिकाचा २ लाख ७६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी जुन्नर तालुक्यातील आळे येथील एका ७३ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद (Pune Crime) दिली आहे. ही घटना कल्याण ते अहमदनगर महामार्गावरील ओतुरकडे जाणार्‍या वडगाव आनंद गावातील रिक्षा स्टँडवर सोमवारी सकाळी साडेदहा वाजता घडली.

ज्येष्ठ नागरिक रिक्षा स्टँडजवळ आले असताना दोघांपैकी एकाने त्यांना बोलावून घेतले. त्याच्याकडील पोलीसाचे आयकार्ड दाखवून मला माझ्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी पाठविले असून पुढे चेकिंग चालू आहे. तुमच्या गळ्यातील सोन्याची चैन व दोन अंगढ्या काढून पिशवीमध्ये ठेवण्यास सांगितले. पिशवीत ठेवत असताना हालचलाखी करुन सोन्याची चैन व २ अंगठ्या असा २ लाख ७६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन घेऊन गेले. पोलीस असल्याची बतावणी करुन शहरामध्ये यापूर्वी असे प्रकार वारंवार घडत असतात.आता त्याचे लोण ग्रामीण भागात सुरु झाल्याचे दिसून येत आहे.

हे देखील वाचा

Palghar Anti Corruption | 70 हजाराचे लाच प्रकरण ! रात्री 11 वाजता ACB चा ‘सापळा’; कारवाईत भाजीपाला विक्रेता आणि पोलीस कर्मचारी ‘जाळ्यात’, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! पत्नी आणि सासुच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या, मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करुन संपवलं ‘जीवन’

RBI | PMC आणि गुरु राघवेंद्र सहकारी बॅंकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर ! नोव्हेंबरपर्यंत मिळणार पैसे , RBI देणार 10 हजार कोटी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | cheating case news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update