×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | ग्राहकांवरुन ताडपत्री व्यावसायिकांमध्ये हाणामारी; टोळक्याने तलवारीने वार करुन केला...

Pune Crime | ग्राहकांवरुन ताडपत्री व्यावसायिकांमध्ये हाणामारी; टोळक्याने तलवारीने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न, फरासखाना पोलिसांकडून दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ताडपत्री (Tarpaulin) खरेदीसाठी येणार्‍या ग्राहकावरुन पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन टोळक्याने तरुणावर पालघन व तलवारीने वार (Sword Strike) करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केला. फरासखाना पोलिसांनी (Faraskhana Police) दोघांना अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)

 

याबाबत द्रोण सुनिल मोरे Drona Sunil More (वय २३, रा. मंगळवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२५/२२) दिली आहे. त्यावरुन तौफिक अस्लम शेख Taufiq Aslam Shaikh (वय १९, रा. मिठानगर, कोंढवा) आणि महेबुब जावेद शेख Mahebub Javed Shaikh (वय १९, रा. जुना बाजार, मंगळवार पेठ) यांना अटक केली आहे. तर, शाहीद शेख Shaheed Sheikh (रा. नवीन म्हाडा कॉलनी, हडपसर) व त्यांचा साथीदार यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवार पेठेतील गणपती मंदिरासमोर शनिवारी रात्री नऊ वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी द्रोण व त्याचा आतेभाऊ सुमित वाघमारे (Sumit Waghmare) हे ताडपत्री विक्रीचा व्यवसाय (Tarpaulin Sales Business) करतात.
८ महिन्यांपूर्वी ताडपत्री खरेदी करता येणार्‍या ग्राहकांवरुन तौफिक व सुमित यांच्यात भांडणे झाले होते.
त्याचा राग मनात धरुन आरोपींनी फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ सुमित हे गणपती मंदिरासमोर आले असताना त्यांना गाठले.
तेव्हा फिर्यादीचा भाऊ पळून गेला. आरोपींनी द्रोण याच्या डोक्यात, कमरेवर पालघन व तलवारीने वार करुन गंभीर जखमी केले.
पोलिसांनी दोघांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक अभंग (Assistant Police Inspector Abhang) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Clashes between tarpaulin traders from customers The gang tried to kill themselves by stabbing them with swords Faraskhana police arrested two

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News