Pune Crime | सामाईक जागेच्या वादातून तिघांना कुऱ्हाडीने मारहाण, लोणी काळभोर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एकाला अटक

पुणे / लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सामाईक जागेच्या (Common Space) वादातून (Disputes) तिघांना कुऱ्हाडीने आणि कुऱ्हाडीचा दांडक्याने मारुन परिसरात दहशत निर्माण केल्याचा प्रकार लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या (Loni Kalbhor Police Station) हद्दीत घडला आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करुन एकाला अटक (Arrest) करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास लोणी काळभोर (Pune Crime) येथील अंबरनाथ मंदिराशेजारी घडली.

 

याबाबत राणी संदीप काळभोर Rani Sandeep Kalbhor (वय-37 रा. प्रथमेश क्रिस्टल, संभाजीनगर, कदमवाक वस्ती, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सूर्यकांत सुभाष काळभोर Suryakant Subhash Kalbhor (वय-43) आणि सुभाष कृष्णाजी काळभोर Subhash Krishnaji Kalbhor (दोघे रा. कदमवाक वस्ती, ता. हवेली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन सुर्यकांत काळभोर याला अटक केली आहे. (Pune Crime)

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

पोलीस उपनिरीक्षक भागवत शेंडगे (PSI Bhagwat Shendge) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे नातेवाईक (Relatives) आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी फिर्यादी यांचा चुलत दिर आहे तर गुन्हा दाखल करण्यात आलेला आरोपी चुलत सासरे आहेत. त्यांच्यामध्ये समाईक जागा असून या जागेचा वाद न्यायालयात (Court) सुरु आहे. मंगळवारी दुपारी फिर्यादी हे सामाईक जागेत साफसफाई करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी सुर्यकांत काळभोर याने सामाईक जागेत कशाला आले आहात असे म्हणत फिर्यादी यांचे सासरे शहाजी काळभोर यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली. तसेच शहाजी यांच्या डोक्यात कुऱ्हाड (Ax) मारुन जखमी केले. चुलत सासरे हरिश्चंद्र काळभोर (वय-62) हे भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांना देखील कुऱ्हाडीने मारुन जखमी केले. तर फिर्यादी यांना कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण केली.

भांडण सुरु असताना फिर्यादी यांच्या जाऊ भारती काळभोर याच्या हातावर आरोपी सुभाष काळभोर याने फरशी मारुन जखमी केले.
तसेच सुर्यकांत याने सासु यमुनाबाई यांच्या हाताच चावा घेऊन शिवीगाळ केली.
आरोपी सुर्यकांत याने फिर्यादी व त्यांच्या इतर नातेवाकांना जीवे मारण्याच्या उद्देशाने हातात कुऱ्हाड घेऊन
अंगावर धाऊन जात परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन दोघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भागवत शेंडगे करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | common land dispute, one arrested by loni kalbhor police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | पाटणकरांवरच्या कारवाईनंतर मुख्यमंत्र्यांंसोबत काय बोलणं झालं?, संजय राऊत म्हणाले….

 

Ashish Shelar | गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून शेलारांची मागणी मान्य, सभागृहात केली मोठी घोषणा (व्हिडीओ)

 

Sharad Pawar | पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘आणखी दरवाढीची शक्यता’