Pune Crime | मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 26 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मागील काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यांवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाकडून (SS Cell, Pune) छापे टाकले जात आहेत. सामाजिक सुरक्षा विभागाने मंगळवारी (दि.3) मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर (Gambling Den) छापा टाकून 26 जणांवर कारवाई केली आहे. तसेच एक लाखाचा (Pune Crime) मुद्देमाल जप्त केला आहे.

 

मुंढवा पोलीस ठाण्याच्या (Mundhwa Police Station) हद्दीत एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांना समजली. त्यानुसार पोलिसांनी पाळत ठेवून छापा टाकला. त्यावेळी काही लोक बेकायदेशीर पैसे लावून जुगार खेळत व खेळवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी 25 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण 1 लाख 3 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (Pune Crime)

 

या प्रकरणी जुगार खेळताना आणि खेळवताना ताब्यात घेण्यात आलेले
आणि एक फरार आरोपी अशा एकूण 26 जणांवर मुंढवा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यांतर्गत
(Maharashtra Gambling Prohibition Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील कारवाई करीता मुंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune Crime | Crime branch raids gambling den in Mundhwa police station limits, action taken against 26 people

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mahavitaran Strike | राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे, कामगार संघटनांची सरकारसोबत सकारात्मक चर्चा (व्हिडिओ)

Ajit Pawar on Nitesh Rane | टिल्ल्या लोकांनी मला शिकवू नये; अजित पवारांचा नितेश राणेंवर निशाणा

IPS Deven Bharti | वरीष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची बृहन्मुंबईच्या विशेष आयुक्तपदी नियुक्ती