Pune Crime | ‘मी इथला भाई आहे’ म्हणत मामावर कुऱ्हाडीने वार, पुण्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पावतीचे पैसे गुगल पेद्वारे (Google Pay) स्वत:च्या नावावर घेतल्याने टेम्पो कामावरुन काढून टाकण्यात आला होता. याला मामा जबाबदार असल्याचा संशय भाच्याला होता. यातून त्याने मामावर कुऱ्हाडीने वार (Axe) करुन गंभीर जखमी केले. ही घटना (Pune Crime) रविवारी (दि.18) दुपारी एकच्या सुमारास राजेवाडी (Rajewadi) येथे घडली.

अभिषण दादू रणदिवे Abhishan Dadu Randive (वय-38 रा. नानापेठ, राजेवाडी) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी (Pune Police) प्रविण देवदास जगधने Pravin Devdas Jagdhane (रा. राजेवाडी, पुणे) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रविण हा फिर्य़ादी यांचा भाचा आहे.
प्रवीण याने त्याच्याकडील टेम्पो पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागासाठी (Pimpri-Chinchwad Traffic Division) भाडेतत्वावर दिला होता. दोन महिन्यांपूर्वी त्याने महानगर पालिकेची पावती स्वत:च्या नावावर गुगल पे द्वारे घेतली होती. त्यामुळे प्रशासनाने त्याचा टेम्पो करारातून वगळला. याला मामा कारणीभूत असल्याचा संशय आरोपी प्रविण याला होता. यातूनच त्याने रविवारी दुपारी मामा अभिषण यांच्यावर कुऱ्हाडीने वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. तसेच मी इथला भाई आहे असे म्हणत मोठमोठ्याने ओरडून कुऱ्हाड हवेत फिरवून दहशत निर्माण केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | crime news pune nephew hit uncle head with ax

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MPSC Students Protest in Pune | पुण्यात MPSCचे विद्यार्थी आक्रमक; आंदोलन करत केल्या ‘या’ मागण्या

Sunny Leone | ‘या’ कारणामुळे आता दीपिका पाठोपाठ ‘ही’अभिनेत्री देखील होत आहे ट्रोल

Jayant Patil | ‘…हे ट्विट नक्की कोणी केले? पायउतार होण्यापूर्वी काय तो निकाल द्या’ – जयंत पाटील