Pune Crime | 37 लाखांच्या फसवणूक प्रकरणी श्री ट्रेडर्सच्या प्रदिप म्हात्रे आणि व्हीजन आयटी सोल्युशनच्या जयेश म्हात्रेविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भाडेतत्वावर घेतलेले तब्बल 119 लॅपटॉप परस्पर दुसऱ्या कंपनीला विकून डेक्कन जिमखाना येथील डाटा केअर कॉर्पोरेशन Data Care Corporation (DCC) या कंपनीची तब्बल 37 लाख 31 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसानी (Deccan Police Station) श्री ट्रेडर्स (Shree Traders) आणि व्हिजन आयटी सोल्युशन्स (vision it solutions) या दोन कंपन्यांच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा (Cheating Case) गुन्हा दाखल केला (Pune Crime) आहे.

 

श्री ट्रेडर्स कंपनीचे संचालक प्रदीप जनार्दन म्हात्रे Pradeep Janardhan Mhatre (रा. चिंचवड) आणि व्हिजन आयटी सोल्युशन्सचे संचालक जयेश दिवाकर म्हात्रे Jayesh Diwakar Mhatre अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी जीवन महादेव कदम (रा. सनसिटी रोड, सिंहगड रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपींच्या श्री ट्रेडर्स आणि व्हिजन आयटी सोल्युशन्स या कंपन्यांनी डिसीसी कंपनीचा विश्वास संपादन करून
त्यांच्याकडून 119 लॅपटॉप भाडेतत्वावर घेतले होते.
26 ऑगस्ट 2020 ते 3 नोव्हेंबर 2020 या कालावधीत डिसीसी कंपनीला कोणतीही माहिती न देता
70 लॅपटॉप स्वेफ्टा कॉम्प्युटर्स चिंचवड व 49 लॅपटॉप इन्फिनिटी कॉम्प्युटर्स चिंचवड या कंपन्यांना (Pune Crime) विकले.

 

आरोपींनी लॅपटॉपचे या काळावधीमधील 7 लाख 56 हजार रुपयांचे भाडे तसेच लॅपटॉपची किंमत 29 लाख 75 हजार 68 रुपये अशी एकूण 37 लाख 31 हजारांची फसवणूक केली.

 

Web Title :- Pune Crime | Data Care Corporation (DCC) ! 37 lakh fraud case against Pradip Mhatre of Shree Traders and Jayesh Mhatre of Vision IT Solutions

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Prabhas | प्रभासने चित्रपटच्या Fees बाबतीत ‘सलमान -अक्षय’ ला देखील सोडलं मागे!

Kolhapur News | कोल्हापूर जिल्ह्यात जादा व्याजाच्या आमिषाने कोट्यवधीची गुंतवणूक

ICC T20 Rankings | बाबर आझम अव्वल स्थानी तर कोहली टॉप 10 मधून OUT