Pune Crime | शहरातील गुन्हेगारांना पिस्तुल विक्री करणाऱ्या आरोपीला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरातील सराईत गुन्हेगारांना पिस्तुल (Pistol) आणि काडतुसे (cartridge) विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या आहे. आरोपी पंडित कांबळे (Pandit Kamble) याने पुण्यातील (Pune Crime) दोन जणांना पिस्तुल विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. पोलीस त्याचा शोध घेत होते मात्र तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर शुक्रवारी (दि.22) त्याला दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या (Dattawadi Police Station) हद्दीतील मांगीरबाबा चौकात बेड्या (Pune Crime) ठोकल्या.

 

सुर्यकांत उर्फ पंडित दशरथ कांबळे Suryakant alias Pandit Dashrath Kamble (वय-26 रा. खड्डा झोपडपट्टी, पुणे सध्या रा. दत्तवाडी) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने रफिक उर्फ बबलु नबीलाल शेख Rafiq alias Bablu Nabilal Shaikh (वय-31 रा. दत्तवाडी) आणि प्रमोद उर्फ कमलेश कैलास घारे Pramod alias Kamlesh Kailas Ghare (वय-31 रा. दांडेकर पुल, पुणे) यांना पिस्तुल विकल्याचे कबुल केले आहे. (Pune Crime)

 

दत्तवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथक गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस हवालदार कुंदन शिंदे (Police Constable Kundan Shinde) आणि प्रशांत शिंदे (Prashant Shinde) यांना माहिती मिळाली की, दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी पंडित कांबळे मांगीरबाबा चौकात आला आहे. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने अटक करण्यात आलेले आरोपी रफिक आणि कमलेश यांना पिस्तुल आणि काडतुसे विक्री केल्याची कबुली दिली.

आरोपी पंडित कांबळे हा शहरातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दोन खुनाचे (Murder), खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), दंगा, विनापरवाना शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे शहरातील येरवडा (Yerawada Police Station), बंडगार्डन (Bundagarden Police Station) व दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. पोलिसांनी 17 मे रोजी रफिक आणि कमलेश यांना अटक करुन पिस्तुल आणि काडतुसे जप्त केली होती. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत हे पिस्तुल पंडित कांबळे याच्याकडुन विकत घेतल्याची माहिती पोलिसांना दिली होती. पोलीस कांबळे याच्या मागावर होते मात्र तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर त्याला शुक्रवारी अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे करीत आहेत.

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Jt CP Joint Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उपायुक्त परीमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड (DCP Pournima Gaikwad),
सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार (Sinhagad Road Division ACP Sunil Pawar),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Senior Police Inspector Abhay Mahajan),
पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे (Police Inspector Vijay Khomane)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे (PSI Chandrakant Kamthe),
पोलीस हवालदार कुंदन शिंदे, प्रशांत शिंदे, चंद्रकांत मरगजे, अमित सुर्वे, नवनाथ भोसले, प्रमोद भोसले,
पुरुषोत्तम गुन्ला, दयानंद तेलंगे, अमित चिव्हे, किशोर वळे, अमोल दबडे, सद्दाम शेख, अनिस तांबोळी यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Dattawadi police arrested the accused who was selling pistols to criminals in the city

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Yogasana For Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांनी शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज करावी ही 2 योगासन

 

Deepak Kesarkar | केसरकर आदित्य ठाकरेंवर संतापले; म्हणाले – ‘जरा आपल्या…’

 

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांच्या अकासा एयरमध्ये (Akasa Air) फ्लाईट बुकिंग सुरू, पहिले उड्डाण 7 ऑगस्टला होणार