Pune Crime | लग्नासाठी वेळ मागून घेतल्याने अश्लील फोटो आईवडिलांना पाठवून केली बदनामी; जळगावमधील तरुणावर कोंढवा पोलिसांनी केला गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) त्याने तिच्याबरोबर शारीरीक संबंध (Physical Relation) प्रस्तापित केले. त्यानंतर तिने लग्नासाठी वेळ मागितल्याने चिडून त्याने दोघांच्या शारीरीक संबंधाचे फोटो, व्हिडिओ तिच्या आई वडिल, मित्रमैत्रिणींना पाठवून बदनामी (Defamation) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी कोंढव्यातील (Kondhwa) एका ३४ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४२१/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तौफिक अहमद भैय्यासाहेब देशपांडे (वय ३२, रा. रामनगर, जळगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देशपांडे याने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याशी नोव्हेंबर २०२० पासून वेळोवेळी शारीरीक संबंध प्रस्तापित केले. फिर्यादी यांनी लग्नासाठी वेळ मागितल्याने त्याने फिर्यादी यांच्या आई वडिलांना धमकाविले. त्यांच्यातील शारीरीक संबंधाचे फोटो, व्हिडिओ २५ एप्रिल रोजी पहाटे त्यांच्या आईच्या मोबाईलवर व्हॉटसअ‍ॅप केले. त्यानंतर ५ मे रोजी फिर्यादीचे वडिल, मित्र, मैत्रिणी, बहीण, नातेवाईक यांना पाठविले. त्यानंतर फिर्यादी यांनी बदनामी केल्याची फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक बिराजदार तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Defamation by sending pornographic photos to parents for taking time for marriage; Kondhwa police has registered a case against a youth from Jalgaon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा