Pune Crime | 20 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी ! कुख्यात गज्या मारणे, रुपेश मारणे, सांगलीचा माजी जि. प. सदस्य हेमंत पाटील, धनकवडीतील पप्पू घोलप यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल

‘मी महाराज बोलतोय, तुमचा जो काय विषय असेल तो मिटवून घ्या, नाही तर तुला संपवून टाकीन’

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शेअर टेडिंगमध्ये (Share Trading) गुंतविलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन त्यासाठी व्यावसायिकाचे अपहरण करुन त्याला मारहाण केल्या प्रकरणी कुख्यात गुंड गज्या मारणे (Gangstar Gajanan Marne) याच्यासह ७ ते १० जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

 

या व्यावसायिकाचे अपहरण केल्यानंतर दुसर्‍याच्या फोनवरुन मी ‘महाराज बोलतोय, तुमचा जो काय विषय असेल तो मिटवून घ्या, नाही तर तुला संपवून टाकीन’, अशी धमकी कुख्यात गुंड गज्या मारणे याने दिल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

या प्रकरणी नांदेड सिटीमध्ये (Nanded City) राहणार्‍या एका ३३ वर्षाच्या व्यावसायिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६७१/२२) दिली आहे. त्यावरुन गज्या मारणे, हेमंत पाटील, फिरोज तात्या, अमर किरदत्त, पप्पु घोलप, रुपेश मारणे (Rupesh Marne), एक महिला व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार कात्रज येथील आयसीआयसीआय बँकेसमोर ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजल्यापासून ८ ऑक्टोबरला दुपारी दीड वाजेपर्यंत घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा रियल इस्टेट व शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. हेमंत पाटील यांनी शेअर ट्रेडिंगसाठी फिर्यादी यांना नोव्हेबर २०२१ मध्ये ४ कोटी रुपये दिले होते. त्यानंतर सुधाकर पाटील यांनी त्यांच्याकडे वेळोवेळी दिलेले पैसे फिर्यादी यांनी त्यांना परत केले आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये फिर्यादी यांना शेअर ट्रेडिंगमध्ये तोटा झाला. त्यामुळे त्यांना हेमंत पाटील याचे ४ कोटी रुपये परत करणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्याने वारंवार पैशांची मागणी केली. तेव्हा फिर्यादी यांनी त्यांना गणपती पुळे येथील ४ कोटी रुपयांची जमीन देण्याची तयारी दर्शविली. तेव्हा हेमंत पाटील याने २० कोटी रुपयांची मागणी केली. सुधाकर पाटील याने हेमंत पाटील हा खूप डेंजर माणूस आहे, त्याच्या मोठमोठ्या गुन्हेगारांशी ओळखी आहे, तुला तो सोडणार नाही, असे सांगितले.

 

त्यानंतर ७ ऑक्टोबर रोजी फिर्यादी व त्यांचा मित्र हे कात्रज येथील आय सी आय सी आय बँकेतून बाहेर आले. तेव्हा त्यांच्या गाडीजवळ चार जण थांबले होते. त्यांनी फिर्यादी यांना जबरदस्तीने गाडीत बसविले. त्यांच्यापैकी एकाने मी पप्पु घोलप आहे, आम्ही गज्या मारणेच्या गँगमधील आहोत. त्यानंतर हेमंत पाटील हा त्यांच्या गाडीत आला. त्यानंतर २० कोटी रुपयांची मागणी केली. तोपर्यंत गाडीतून फिर्यादी यांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरवत ठेवले होते.

तेव्हा पप्पु घोलप याने संतोष नावाच्या साथीदाराला फोन लावला व गज्या मारणेला फोन द्या असे सांगितले. त्यानंतर तो फिर्यादीला म्हणाला की, “मी महाराज बोलतोय, तुमचा जो काय विषय असेल तो मिटवून घ्या, नाही तर तुला संपवून टाकीन,” अशी धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी यांनी घाबरुन पैसे देण्यास होकार दिला. त्यानंतर फिरोज तात्या, अमर किरदत्त, हेमंत पाटील यांनी तुला पैसे महत्वाचे की जीव असे म्हणून हाताने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी यांनी मित्रांना व भावाला फोन लावायला सांगितला. त्यांच्याशी बोलणे झाल्यावर रात्री १० वाजता रावेत येथील हॉटेल तोरणा येथे त्यांना नेण्यात आले. त्यांच्याबरोबर एक महिला होती.

 

 

अमर किरदत्त याने “तु या ठिकाणी जेवण नीट कर व शांत रहा,” असे सांगितले. बरोबरच्या महिलेने “तु जर येथे काही वेड वाकड केला तर तुझ्यावर मी बलात्काराचा गुन्हा दाखल करेल,” अशी धमकी दिली. जेवण झाल्यावर त्यांना गाडीतून हायवेवर फिरवत राहिले. मध्यरात्री दीड वाजता त्यांचा मित्र चांदणी चौकात आला. त्याच्याशी बोलल्यानंतर फिर्यादी यांना सोडून देण्यात आले व कोणाशी बोलल्यास, पोलिसांना माहिती दिली तर तुला व तुझ्या घरांच्याना जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. पप्पु घोलप याने सकाळी १० वाजता त्याच्या ऑफिसला बोलावले. त्यानंतर ते पप्पु घोलपच्या ऑफिसवर गेले. त्यापूर्वीच फिर्यादीच्या भावाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. पोलीस शोध घेत होते. त्यानंतर पप्पु घोलप याने फिर्यादीला त्याच्या भावाच्या ताब्यात द्या, असे सांगितले. त्यानुसार दुपारी दीड वाजता एस जी एस मॉलजवळ त्यांनी फिर्यादीला त्यांच्या भावाच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस आयुक्तालयात जाऊन खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार केली.

 

गज्या मारणे याने तळोजा तुरुंगातून सुटल्यावर मुंबई -पुणे महामार्गावर रॅली काढली होती.
त्यावरुन त्याच्यावर गुन्हे दाखल झाले होते.
या प्रकरानंतर त्याला एक वर्ष स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यातून सुटून आल्यावर तो शांत होता.
मात्र, आता सुपारी घेऊन मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, खंडणी विरोधी पथकाने काही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
व्यावसायिकाची सुखरूप सुटका करण्यात देखील पोलिसांना यश आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare),
युनिट-5 चे हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे (API Changdev Sajjanne),
पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार विजय गुरव,
प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, राहुल उत्तरकर, विनोद साळुंके, अनिल मेंगडे, संग्राम शिनगार, सचिन अहिवळे,
सैदोबा भोजराव, सुरेंद्र साबळे, अमोल पिलाणे, चेतन आपटे, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, किशोर बर्गे, पवन भोसले,
रवि सपकाळ व महिला पोलीस अंमलदार आशा कोळेकर, रुपाली कर्णवर यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Demand for ransom of 20 crore rupees! Extortion Case Against Notorious Criminal and gangster Gajanan Marne, Rupesh Marne, Hemant Patil, Pappu Gholap and others

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा