Pune Crime | पुण्यात धायरीत टोळक्याकडून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन वाहनांची तोडफोड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यात मागील काही दिवसांपासून वाहन तोडफोडीचे (Vehicle vandalism) सत्र सुरुच आहे. सिंहगड रस्ता (Sinhagad Road) परिसरातील धायरी (Dhayari) भागात वैमनस्यातून टोळक्याने तरुणावर धारदार शस्त्राने (Pune Crime) वार केले. तसेच परिसरातील वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे.

 

या घटनेत गजानन राठोड Gajanan Rathod (वय – 29 रा. धायरी) हे जखमी झाले आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) टोळक्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत जखमी गजानन राठोड यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

राठोड हे धायरी येथील चव्हाण आळीमधून जात होते. त्यावेळी टोळक्याने पूर्वी झालेल्या वादातून (Dispute) राठोड यांना आडवले. टोळक्याने राठोड यांच्यावर हल्ला करुन कोयत्याने वार (Sharp Weapons) केले. तसेच परिसरात दहशत (Terror) माजवण्यासाठी पार्क केलेल्या दुचाकींची तोडफोड करुन टोळके पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन थोरबोले (PSI Chetan Thorbole) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | dhayari vandalism of vehicles attack youth sharp weapons police pune crime news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा