Pune Crime | रिक्षाने प्रवास करताना ज्येष्ठ महिलेला मारहाण करुन लुबाडले; रिक्षाचालकाला अटक

पुणे : Pune Crime | स्वारगेट एसटी स्टँडवरुन (Swargate ST Stand) वाघोलीला जाणार्‍या रिक्षातील चौघांनी ज्येष्ठ महिलेला व तिच्या पतीला मारहाण (Beating) करुन त्यांच्याकडील सोन्याचे दागिने (Gold Jewelry) असलेली पर्स चोरुन नेली. (Pune Crime)

स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police) रिक्षाचालक नदीम नफीस शेख Rickshaw Driver Nadeem Nafees Sheikh (वय ३०, रा. मोहम्मदवाडी, हडपसर) याला अटक (Arrest) केली आहे.

याप्रकरणी सातारा येथील खटावमधील एका ६५ वर्षाच्या महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २२१/२२) दिली आहे. हा प्रकार ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता स्वारगेट एस टी स्टँड ते पुणे स्टेशन (Swargate ST Stand to Pune Station) दरम्यान प्रवासात रिक्षामध्ये घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांचे पती व मुलगी हे स्वारगेट एसटी स्टँडवर उतरले.
त्यांनी वाघोलीला जाण्यासाठी स्वारगेट ते पुणे स्टेशन अशी शेअर वाहतूक करणार्‍या रिक्षात बसले.
त्यांच्याबरोबर इतर तीन प्रवासी म्हणून बसले. प्रवासादरम्यान, त्यांनी फिर्यादी यांच्या पतीस हाताने चापटी मारल्या.
फिर्यादी यांच्या हातामध्ये असलेली ७६ ग्रॅम वजनाची १ लाख २१ हजार रुपयांचे दागिने असलेली पर्स जबरदस्तीने हिसकावून जीवे मारण्याची धमकी देऊन ते रिक्षातून उतरुन पळून गेले.
स्वारगेट पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक संदे
(Assistant Police Inspector Sande) तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime | Elderly woman beaten and robbed while traveling by rickshaw; Rickshaw driver arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | चंद्रकांत पाटलांची सीबीआय चौकशी करा, मराठा आरक्षणासंबंधी कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर खळबळ, देवाण-घेवाणीचा उल्लेख

Rohit Pawar | भाजप याद्या बघून काम करते, ते विद्यार्थ्यांची परिस्थिती बघत नाहीत; फी वाढीवरुन रोहित पवारांचा भाजपवर आरोप