Pune Crime | खळबळजनक ! पोलीस असल्याचे सांगून महिलेवर बलात्कार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पोलीस (Police) असल्याचे सांगून मुलीसोबत एकट्या राहणाऱ्या महिलेवर बलात्कार (Rape In Pune) केला. एवढेच नाही तर गरोदर (Pregnant) राहिलेल्या महिलेचा जबरदस्तीने गर्भपात (Abortion) केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) उघडकीस आली आहे. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) एकावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2020 ते 2 जानेवारी 2022 या कालावधीत साखरेवस्ती, भोसरी आणि हिंजवडी फेज वन (Hinjewadi Phase One) येथे घडला (Pune Crime) आहे.

 

आकाश प्रकाश पांढरे (Akash Prakash Pandhre) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एका महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.26) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही त्यांच्या मुलीसोबत भोसरी परिसरात राहतात. त्या एकट्या राहत असल्याचा गैरफायदा आरोपीने घेतला. आरोपी आकाश याने आपण पोलीस असल्याचे सांगून महिलेला धमकावले. तू एकटी कशी राहतेस बघतो असे म्हणून महिलेला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवले. त्यानंतर त्याने महिलेवर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वारंवार शारीरिक संबंध (Physical Relations) व अनैसर्गिक संबध (Unnatural Relations) ठेवले. महिला गरोदर राहिल्याचे समजल्यानंतर आरोपीने फिर्यादीला गर्भपाताच्या गोळ्या खायला घालून गर्भपात केला. असे फिर्यादीत म्हटले आहे, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा कदम (PSI Pooja Kadam) करीत आहेत. (Pune Crime)

 

Web Title :-  Pune Crime | Exciting Woman raped by Akash Prakash Pandhre

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा