Pune Crime | स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स ‘रॅकेट’चा पर्दाफाश, 5 महिलांची सुटका; जागा मालकासह 3 जणांवर FIR

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | स्पा सेंटरच्या नावाखाली (Spa Center In Pune) सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा (prostitution business) पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) सामाजिक सुरक्षा विभाग व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने (AHTU Pimpri) पर्दाफाश केला आहे. पथकाने केलेल्या कारवाईत पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई वाकड येथील ब्लॉसम सलून अँड स्पा सेंटर (Blossom Salon & Spa Center Pune) येथे शुक्रवारी (दि.17) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास केली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरातील स्पा सेंटरमध्ये (Pune Crime) सुरु असलेल्या गोरख धंद्याचा पर्दाफाश झाला आहे.

 

स्पा सेंटरचा चालक-मालक सचिन सुरेश भिसे (वय-33 रा. शिरढोण, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद), स्पा सेंटरची मॅनेजर, अभय मारुतीराव छिद्री (वय-40 रा. रहाटणी, काळेवाडी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याप्रकरणी महिला पोलीस शिपाई सोनाली विलास माने Sonali Vilas Mane (वय-27) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad police station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन भिसे आणि मोहिनी यांनी 5 महिलांना पैशांचे आमिष दाखवून
त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले.
यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करुन 5 पीडित महिलांची सुटका केली.
आरोपी अभय छिद्री याने त्याच्या नावावर असलेली जागा कोणतेही अ‍ॅग्रीमेंट (Agreement) न करता आरोपी सचिन आणि मोहिनी यांना उपलब्ध करुन दिली.
त्यांनी या जागेवर स्पा सेंटरच्या (Spa Center In Pune) नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु केला.
वेश्या व्यवसायासाठी जागा उपलब्ध करुन दिल्या प्रकरणी जागा मालक अभय छिद्री (Abhay Marutirao Chhidri)
याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सिसोदे (PSI Sisode) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | exposing prostitution business name spa center 5 victimized women released pimpri AHTU-Blossom Salon & Spa Center Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | वनविभागाची आणि शासनाची बदनामी करणाऱ्या 2 युट्युब चॅनेलवर पुण्याच्या सायबर पोलिस ठाण्यात FIR

Disha Patani Bold Photo | दिशा पटानीच्या ‘या’ ओपन ड्रेसमूळं शेजारी बसलेला व्यक्ती तिच्याकडं टक लावून बघत बसला; पाहा व्हायरल फोटो

SBI च्या चेकचे पेमेंट रोखणे आहे अतिशय सोपे, फॉलो कराव्या लागतील ‘या’ सोप्या स्टेप