Pune Crime | वनविभागाची आणि शासनाची बदनामी करणाऱ्या 2 युट्युब चॅनेलवर पुण्याच्या सायबर पोलिस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | वनविभागाने (Forest Department) केलेल्या अतिक्रमण कारवाईनंतर (Encroachment action) दोन युट्युब चॅनेलने (YouTube channel) वनविभागाची आणि शासनाची बदनामी (Government defamation) करुन दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस (Pune Crime) आला आहे. याप्रकरणी दोन युट्यूब चॅनेलच्या मालकांवर सायबर पोलीस ठाण्यात (Cyber police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.16) घडला आहे.

 

पुणे सायबर पोलिसांनी ashutosh Jha Thoughts’s आणि shivshankar Swami यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मनोज संजय पारखे (वय-28 रा. मनपा शाळेजवळ, बाणेर) यांनी सायबर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.17) फिर्याद दिली आहे.

 

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनविभागाने कायदेशीर अतिक्रमण काढण्याची कारवाई केली होती.
आरोपींनी युट्युबच्या माध्यमातून दोन धर्मामध्ये (Pune Crime) तेढ निर्माण करणारा व्हिडिओ संदेश व्हायरल केला.
या व्हायरल संदेशाच्या माध्यमातून आरोपींनी वनविभागाची आणि
महाराष्ट्र सरकारची बदनामी करुन खोटी माहिती प्रसारीत केल्याची तक्रार मनोज पारखे (Manoj Parkhe) यांनी दिली आहे.
त्यानुसार दोन युट्युब चॅनेलच्या मालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
पुढिल तपास पोलीस निरीक्षक संगिता माळी (Police Inspector Sangita Mali) करीत आहेत.

वनविभागाचे अधिकारी मनोज पारखे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वनविभागाने एका गोशाळेवर कारवाई केली होती.
त्यावेळी आरोपींनी त्याचे चित्रिकरण करुन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा संदेशाचे व्हिडिओ प्रसारीत करुन वनविभागाची आणि शासनाची बदनामी केली.

 

Web Title :- Pune Crime | FIR in Pune Cyber ​​Police Station on 2 YouTube channels defaming Forest Department and Maharashtra Government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Disha Patani Bold Photo | दिशा पटानीच्या ‘या’ ओपन ड्रेसमूळं शेजारी बसलेला व्यक्ती तिच्याकडं टक लावून बघत बसला; पाहा व्हायरल फोटो

SBI च्या चेकचे पेमेंट रोखणे आहे अतिशय सोपे, फॉलो कराव्या लागतील ‘या’ सोप्या स्टेप

Richa Chadha | इंटर्नशिप दरम्यान अभय देओलने मुलाखत देण्यास दिला होता नकार, काही काळानंतर रिचाने त्याच्यासोबत चित्रपटात केले पदार्पण

Anti Corruption Bureau | 1 रुपया हुंडा घेऊन सर्वांकडून पाठ थोपटून घेणारा नार्कोटिक्स विभागातील पोलीस निरीक्षक 2 लाखांची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

Ankita Lokhande-Vicky Jain Wedding | लग्नानंतर तब्बल 1.2 करोड रुपयांच्या कारमध्ये विक्की जैनसोबत पोहचली नववधू अंकिता लोखंडे