Pune Crime | प्रॉपर्टी नावावर करून देण्यासाठी मुलांकडून वडिलांना बेदम मारहाण

पुणे : Pune Crime | वडिलांच्या मालकीची जमीन आपल्या नावावर करून घेण्यासाठी दोन मुलांनी माणुसकीची हद्द ओलांडली आहे. या दोघांनी घरासमोर झोपलेल्या स्वतःच्याच वडिलांना काठ्यांनी बेदम मारहाण (Pune Crime) केल्याची घटना यवत येथे घडली. याप्रकरणी यवत पोलिसांनी (yavat police) गुन्हा दाखल केला आहे.

बाळू लक्ष्‍मण पिंगळे आणि तालू लक्ष्मण पिंगळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी लक्ष्मण भिवा पिंगळे (वय 50 रा. दत्तवाडी, देऊळगावगाडा, दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 13 ऑगस्ट रोजी रात्री अकराच्या सुमारास घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्‍मण पिंगळे यांचा पारंपरिक शेतीचा व्यवसाय आहे. त्यांची गावामध्ये मोठी जमीन आहे. मागील काही दिवसांपासून या जागेवरून मुलांमध्ये आणि त्यांच्यामध्ये वाद सुरू आहेत. मुलांनी ही जमीन स्वतःच्या नावावर करून देण्यासाठी वडिलांकडे तगादा लावला आहे. 13 ऑगस्ट रोजी रात्री लक्ष्‍मण पिंगळे घरासमोर झोपलेले असताना त्यांची दोन्ही मुले तेथे आली. त्यांनी तुझ्या नावावर ची जमीन आमच्या नावावर करून दे असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली. तसेच लाकडी दांडक्याने जबर मारहाण करीत दुखापत केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Honey Trap Racket Pune | हनी ट्रॅपद्वारे व्यावसायिकाला लुटणारी टोळी अटकेत, कोंढवा पोलिसांकडून तरूणीसह 6 जणांना अटक

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

Raviraj Taware Firing case | रविराज तावरे गोळीबार प्रकरणात पुन्हा माळेगावचे माजी सरपंच जयदीप तावरेंना अटक होणार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Fathers beaten to death by children in the name of property

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update