Pune Crime | बाल विवाह केल्याप्रकरणी पती आणि मुलीच्या वडिलांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कायद्याने बाल विवाह (Child Marriage) करणे आणि लावून देणे हा गुन्हा (Crime) असताना देखील अनेक ठिकाणी बाल विवाह लावले जात आहेत. असाच एक प्रकार पुणे जिल्ह्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलगी गरोदर (Pregnant) राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या पती (Husband) आणि तिच्या वडिलांवर (Father) चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) आयपीसी (IPC) 376, बाल विवाह कायदा (Child Marriage Act) कलम 9,10,11 सह पोक्सो अॅक्ट (Pocso Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका महिला पोलीस अंमलदार यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी 19 वर्षाच्या पतीवर आणि मुलीच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 27 जूलै 2021 रोजी खेड तालुक्यात (Khed Taluka) घडला असून मंगळवारी (दि.26) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 17 वर्षाच्या मुलीच्या वडिलांनी तिचा 19 वर्षाच्या तरुणासोबत 27 जुलै 2021 रोजी विवाह लावून दिला. मुलगी अल्पवयीन (Minor) असल्याचे माहित असताना देखील मुलीच्या वडिलांनी तिचा विवाह केला. त्यानंतर पतीने तिच्यासोबत शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित करुन तिला तीन महिन्यांची गरोदर केले. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार (Rape), बाल विवाह कायदा, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड (API Gaikwad) करीत आहेत.

Web Title : Pune Crime | FIR against husband and daughter’s father in child marriage case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

शारीरीक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी;
घरी, वेगवेगळ्या हॉटेल रुममध्ये आणि कारमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार

 

Navneet Ravi Rana Sent To Judicial Custody | राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ !
कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावरील सुनावणीही लांबणीवर

 

 घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना

 

Pune Crime | इन्स्टाग्रामवर बनला मित्र, 20 वर्षाच्या तरुणीला कोल्ड्रींग मधून गुंगीचे औषध देऊन दाखवलं ‘काम’,
बलात्कार प्रकरणी FI