Pune Crime | लाईट तोडल्याच्या रागातून ग्राहकाचा दापोडीमधील महावितरण कार्यालयात राडा, भोसरी पोलीस ठाण्यात FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | वीजबील भरले नसल्याने महावितरण कंपनीने (MSEDCL) वीजपुरवठा (Power supply) खंडित केल्याच्या रागातून एका ग्राहकाने महावितरणच्या कार्यालयात येऊन कर्मचाऱ्यांना शिविगाळ केल्याची घटना घडली आहे. ही घटना महावितरणच्या दापोडी कार्यालयात (Dapodi office) घडली (Pune Crime) आहे. याप्रकरणी ग्राहकाविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari police station) फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदर्श शिंदे Adarsh Shinde (रा. काटे रेसीडन्सी बिल्डिंग, दापोडी, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ललीता अनिल कुटे Lalita Anil Kute (वय-45 रा. आकुर्डी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी शिंदे विरुद्ध कलम 353, 504 व 506 नुसार गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

महावितरण कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, महावितरणच्या पिंपरी विभाग अंतर्गत दापोडी शाखा कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी (दि. 23) दापोडी येथील काटे रेसिडेन्सी मधील (Kate Residency) थकबाकीदार ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर दुपारी सर्व कर्मचारी दापोडी कार्यालयात काम करीत होते. त्यावेळी आदर्श शिंदे याने कार्यालयात येऊन काटे रेसिडेन्सीमधील घराचा वीजपुरवठा का खंडित केला असे जोरजोराने ओरडून शिवीगाळ सुरु केली.

त्याने एका महिला कर्मचाऱ्याकडून थकबाकीदारांच्या नावाची
यादी व मोबाईल हिसकावून घेतला व फेकून दिला तसेच कार्यालयातील
सर्वांना दमदाटी केली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा
आणल्याप्रकरणी या आरोपीविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | FIR lodged at Radha, Bhosari police station at MSEDCL office in Dapodi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

ST Workers Strike | संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाचा दणका, बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यास नकार

Ajit Pawar | ‘शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यास सरकार कटिबद्ध’ – अजित पवार

MahaTET Exam Scam Case | टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण ! तुकाराम सुपेच्या घर, कार्यालयात आणखी मोठं घबाड सापडलं

Maharashtra Rains | राज्यात पुन्हा विजा कडाडणार, नववर्षाआधी राज्यात ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता

Crime News | दोन सख्ख्या बहिणींचा संशयास्पद मृत्यू

Pune Metro-Sambhaji Bridge Traffic | पुण्यातील संभाजी पुलावरील (लकडी पुल) वाहतूक ‘या’ वेळेत बंद राहणार