Ajit Pawar | ‘शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यास सरकार कटिबद्ध’ – अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | महात्मा ज्योतिबा फुले किसान कर्जमाफी योजनेतंर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmer) सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात राज्य सरकार (Maharashtra Government) कटिबद्ध असून सरकार या घोषणेपासून कदापी पळ काढणार नसल्याची स्पष्ट ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अधिवेशनादरम्यान सभागृहात दिली आहे.

 

विधिमंडळाचे सध्या हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter session) सुरु आहे. यावेळी विरोधकांकडून राज्यातील विविध मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांना सवाल केले जात आहेत. त्यामध्ये शिवसेना आमदाराने शेतकऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाचा ताराकींत सवाल केला होता. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘कोरोनामुळे राज्याची तसेच देशाचीही परिस्थिती कमकुवत झालीय. लॉकडाऊनमुळे राज्याचे एक ते दीड लाख कोटींचे उत्पन्न घटले आहे. आर्थिक परिस्थिती पुर्वपदावर आल्यानंतर उरलेल्या शेतकऱ्यांना मदत देणारच अशी घोषणा देखील त्यांनी केली. तसेच कर्ज वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतचे पिक कर्ज शून्य टक्के व्याजाने देणारे एकमेव राज्य असल्याचे ते म्हणाले.

 

 

ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यासाठी 3 निर्णय घेतले होते. 2 लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी‌ तर 2 लाखांच्यावर कर्ज असणाऱ्यांनी वरच्या‌ कर्जाची परतफेड केल्यास त्यांनाही 2 लाखांची माफी आणि ज्यांनी कर्जाची वेळेत परतफेड केली अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.

 

आमदार प्रकाश आबिटकर (MLA Prakash Abitkar) यांनी याबाबत तारांकीत सवाल उपस्थित केला होता,
यानंतर अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. ‘या योजनेतंर्गत 31 लाख 81 हजार शेतकऱ्यांना पात्र ठरवत 20 हजार 290 कोटींचे वाटप करण्यात आले आहे.
काही शेतकर्‍यांना पुरवणी मागण्यात तरतूद केल्याप्रमाणे मदत मिळेल.
तर उर्वरित सर्व शेतकऱ्यांना पुढील अर्थसंकल्पात मदत जाहीर करु,’ अशी घोषणा देखील अजित पवार यांनी केली आहे.

 

Web Title :- Ajit Pawar | Maharashtra government committed provide sanugrah subsidy farmers said deputy chief minister ajit pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा