Pune Crime Firing News | धक्कादायक! पुण्यात सराफा व्यवसायिकावर गोळीबार करुन दागिन्यांची बॅग पळवली, हल्लेखोरांनी झाडल्या 6 गोळ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Firing News | दिवाळीचे दिवस असल्याने लोकांची सोने-चांदी खरेदी (Gold-Silver Purchase) करण्याची लगबग सुरु आहे. यातच सोने-चांदी घरी घेऊन जात असताना एका सराफा व्यवसायिकावर (Bullion Traders) दोघा चोरट्यांनी गोळीबार (Firing In Pune) करुन दागिन्यांची बॅग पळवून नेल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. ही घटना वानवडीतील बी.टी. कवडे रोडवर बुधवारी (दि.8) रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. (Pune Crime Firing News)

या घटनेत सराफ व्यवसायिक प्रदीप मदनलाल ओसवाल (वय-35 रा. मुंढवा) हे जखमी झाले आहेत. त्यांच्या पायावर दोन व तोंडावर एक अशा तीन गोळ्या लागल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रदीप ओसवाल यांचे हडपसर परिसरातील सय्यदनगर येथे सराफी दुकान आहे. दिवाळीनिमित्त दुकानात दागिने मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले होते. त्यामुळे हल्लेखोर ओसलवाल यांच्यावर पाळत ठेवून असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ओसवाल हे दुकान बंद करुन दुचाकीवरुन घरी जात होते. त्यावेळी बी.टी. कवडे रोडवर त्यांना हल्लेखोरांनी अडवले. (Pune Crime Firing News)

हल्लेखोरांनी ओसवाल यांच्यावर एका पाठोपाठ एक सहा गोळ्या झाडल्या. त्यातील तीन गोळ्या ओसवाल यांना लागल्या.
त्यानंतर चोरट्यांनी ओसवाल यांच्याजवळ असलेली दागिन्यांची बॅग हिसकावून ते पळून गेले. गोळीबाराचा आवाज ऐकून नागरिकांनी तिकडे धाव घेतली. ओसवाल यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), गुन्हे शाखेचे
सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) यांच्यासह वानवडी पोलीस ठाण्यातील
(Wanwadi Police Station) पोलीस निरीक्षक संजय पतंगे (PI Sanjay Patange) यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी तातडीने नाकाबंदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुण्यातील वानवडी परिसरातील बीटी कवडे रोडवर एकावर गोळीबार, प्रचंड खळबळ

जाहिरात होर्डींग्जच्या बदल्यात स्वच्छतागृहांच्या देखभाल दुरूस्ती ! महापालिकेने प्रायोगीक तत्वावर काढली चार स्वच्छतागृहांची निविदा

सुरक्षारक्षकांची फौज तैनात असताना ‘मार्केटयार्डात’ शेतमालाच्या चोर्‍या वाढल्या; शेतकरी व विक्रेते हवालदील