Pune Crime | पुण्यात भरदिवसा पोलिस चौकीपासून हकेच्या अंतरावर तरूणावर बेछुट गोळीबार ! भारती विद्यापीठ परिसरातील घटना, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यात भरदिवसा गोळीबारची (Firing in Pune) घटना घडली आहे. पोलिस चौकीपासून अगदी हकेच्या अंतरावर गोळीबार झाला आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. चौकीच्या अगदी जवळच बेछुट गोळीबार झाला आहे. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी एका तरूणावर गोळीबार केला आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रोहित वडेवाले (Rohit Wadewale) जवळील चंद्रभागा वाईन्सच्या (Chandrabhaga Wines) समोर ही घटना (Pune Crime) घडली आहे.

 

सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलिस चौकीपासुन (Bharti Vidyapeeth Police Chowki) अगदी हकेच्या अंतरावर हा गोळीबार झाला आहे. भरदिवसा आणि पोलिस चौकीपासून हकेच्या अंतरावर गोळीबार (Firing) झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. तरूणावर बेछुट गोळीबार झाल्याने तरूण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी (Pune Police Crime Branch) व कर्मचारी तसेच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील (Bharti Vidyapeeth Police Station) अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान, गोळीबार कशामुळं झाला हे अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान, ‘समीर मनूर शेख’ (sameer manoor shaikh) नाव असलेल्यावर बेछुट गोळीबार झाला आहे अशी माहिती समोर येत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान, पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही मिळतंय काय हे तपासण्याचे काम सुरू आहे.

 

पुण्यात भरदिवसा गोळीबार झाल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे. अति वरिष्ठ अधिकार्‍यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे अशी माहिती समोर आली आहे. नेमके किती राऊंड फायर झालेत हे सांगता येत नसलं तरी भारती विद्यापीठ पोलिस चौकीपासून हकेच्या अंतरावर बेछुट गोळीबार झाल्याची माहिती समोर येत (Pune Crime) आहे. दरम्यान, याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दुपारी 12 वाजता या घटनेची खबर प्राप्त झाली आहे.

दरम्यान, गोळीबारामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या समीर मनूर याचा जागीच मृत्यू झाला आहे अशी माहिती समोर येत आहे. समीर हा काँग्रेसचा पदाधिकारी होता.

 

Web Title :- Pune Crime | firing on a youth near bharti vidyapeeth police chowki in Pune all day long! Incidents on Bharati vidyapeeth police station area, huge excitement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | खंडणी न दिल्याने हातगाडी चालकाचे घरातून अपहरण अन् विश्रांतवाडी केली बेदम मारहाण; परिसरातील घटना

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगाराचा वारजे पोलीस चौकीत आत्महत्येचा प्रयत्न; दारू पिऊन केला ‘राडा’, प्रचंड खळबळ

Modi Government | ‘मायचं दूध प्यायला असाल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवा’, मोदी सरकारमधील महाराष्ट्रातील मंत्र्याचं खुलं ‘चॅलेंज’