Homeताज्या बातम्याModi Government | 'मायचं दूध प्यायला असाल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवा',...

Modi Government | ‘मायचं दूध प्यायला असाल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवा’, मोदी सरकारमधील महाराष्ट्रातील मंत्र्याचं खुलं ‘चॅलेंज’

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – Modi Government | मायचं दूध प्यायलं असेल तर माझा भ्रष्टाचार (Corruption) काढून दाखवा, असं खुलं आव्हान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी नाव न घेता अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांना दिले आहे. आज मोदी सरकारमधील (Modi Government)
राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते जालना नगरपरिषदे अंतर्गत मंजूर झालेल्या सिमेंट रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.

 

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी ईडीने (ED) छापा टाकला होता. त्यानंतर खोतकर यांनी दानवे यांच्या सांगण्यावरुनच ईडीने ही कारवाई केल्याचा आरोप केला होता. तसेच दानवे यांनीच रस्त्याच्या कामात घोटाळे केल्याचा आरोप करत ते उघड करण्याचा इशारा खोतकर यांनी दिला होता. यावरून आज दानवे यांनी खोतकरांचा चांगलाच समाचार घेतला.

 

आज झालेल्या कार्यक्रमाला काँग्रेसचे जालना विधानसभा मतदार संघाचे आमदार कैलास गोरंट्याल (MLA Kailas Gorantyal), नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल (Mayor Sangeeta Gorantyal) हे उपस्थित होते. एका 400 लोकसंख्या असलेल्या गावातून येऊन आपण केंद्रीय मंत्रीपदापर्यंत खूप मोठी झेप घेतली असून लोक माझ्यावर जसे आरोप करतात तसा मी माझ्या राजकीय आयुष्यात आणखी मोठा होत चाललोय. मी चिडचिड करणार नाही, कुणावरही आरोप करणार नाही, असा टोला मोदी सरकारमधील (Modi Government) मंत्री दानवे यांनी खोतकरांना लगावला.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचं (Mumbai-Nagpur Samruddhi Highway)
काम करत असलेल्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांची यादी असून गडकरी यांनी या यादीतील नाव जाहीर करावीत.
या यादीतील नावं गडकरी यांनी जाहीर केल्यास आणखी एखादी टीम घरी येईल असा टोला काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांचं नाव न घेता लगावला.

 

Web Title :- Modi Government | MoS raosaheb danve on arjun khotkar live in jalna modi government news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PF Account | खुशखबर ! प्रत्येक ‘पीएफ’ खातेधारकाला मिळेल 50 हजार रुपयांचा अ‍ॅडिशनल ‘बोनस’, फक्त पूर्ण करा ‘या’ अटी

Omicron Covid Variant | चिंताजनक ! पुण्यानंतर जयपूरमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग

Jacqueline Fernandez | 200 कोटीचे खंडणी प्रकरण! अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मुंबई विमानतळावर देशाबाहेर जाण्यापासून रोखले

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News