Pune Crime | ऑक्सीटोसीन औषधाचे उत्पादन करणार्‍या पाच जणांना अटक; गायी, म्हशीचे दुध वाढविण्यासाठी होतो वापर, ५२ लाखांचा माल जप्त

पुणे : Pune Crime | जनावरांचे दुध (Milk) वाढविण्यासाठी बेकायदेशीरपणे वापरलेल्या जाणार्‍या ऑक्सीटोसीन औषधाचे (Oxytocin Medication) बेकायदेशीरपणे उत्पादन करणार्‍या कारखान्यावर पोलिसांनी (Pune Police) छापा घालून पाच जणांना पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. या कारखान्यातून तब्बल ५२ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime)

समीर कुरेशी Sameer Qureshi (वय २९), विश्वजीत जाना, मंगल गिरी Mangal Giri (वय २७), सत्यजीत मोन्डल (Satyajit Mondal), श्रीमंता हल्वर (Srimanta Halwar) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, बाबुभाई ऊर्फ अल्लाउद्दीन (Babubhai alias Allauddin) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी औषध निरीक्षक सुहास तानाजी सावंत (Inspector Suhas Tanaji Sawant) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४२१/२२) दिली आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्सीटोसिन हे एक हार्मोंन आहे. प्रसृती दरम्यान महिलांना ऑक्सीटोसिन इंजेक्शन दिले जाते. हे लाईफ सेव्हिंग ड्रग म्हणून ओळखले जाते. त्याचा वापर केल्याने जनावरांकडून दुध जास्त मिळते, याचा प्रसार झाला. परंतु, अशा इंजेक्शन दिलेल्या जनावरांचे दुध पिल्याने त्यापासून मानवाला अनेक रोगांना आमंत्रण मिळू शकते. शरीरातील रोगप्रतिकार क्षमता कमी होऊ शकते. श्रवण कमजोरी, दृष्टीहीनता, पोटाचे आजार होण्याची शक्यता आहे. तसेच जनावरांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या इंजेक्शनवर निर्बंध घालण्यात आले आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (Anti Narcotics Squad) हवालदार पवार यांना कलवड वस्तीतील एका
पत्र्याच्या शेडमध्ये या इंजेक्शने उत्पादन करण्यात येत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकांनी अन्न व औषध प्रशासनाला (Food and Drug Administration)
याची माहिती देऊन या पत्र्याच्या शेडवर छापा घातला. तेव्हा तेथे या इंजेक्शनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले
जात असल्याचे दिसून आले. त्यातील समीर कुरेशी हा मुख्य सुत्रधार असून त्याने या पत्र्याच्या शेडमध्ये हे
इंजेक्शनाचे उत्पादन सुरु केले आहे. इतरांच्या मदतीने ते औषध विक्रेते असल्याचे भासवून शेतकर्‍यांना
ऑक्सीटोसीन औषधाची विक्री करत आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर इंजेक्शनचा साठा, तसेच ते
तयार करण्यासाठीचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक ढेंगळे
(Assistant Police Inspector Dhengle) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime | Five arrested for manufacturing Oxytocin drug; Cows, buffaloes are used to increase milk, goods worth 52 lakhs seized

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | राज्यसभा निवडणुकीत भाजपला मिळालेली जादा मतं कोणाची?, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

T20 World Cup 2022 | दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! भारताची सेमीफायनलमध्ये धडक

Ind vs Zim | मेलबर्नमधील सामन्यात रोहित शर्मा करणार टीममध्ये बदल? ‘या’ खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता