Pune Crime | सैन्य भरतीत बनावट जन्मदाखला देऊन बॉम्बे इंजिनियरिंगची फसवणूक; पुण्याच्या विश्रांतवाडीमधील घटना

पुणे : Pune Crime | बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुपच्या (bombay engineer group) रिलेशन भरतीसाठी बनावट जन्म दाखला सादर करुन वय लपवून भरतीसाठी पात्र होण्याचा प्रयत्न करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा (Pune Crime)दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी (Vishrantwadi Police) परसराम बलीराम डोंगरे (रा. बजाला, पो़ पुलसंगावी, ता. गेवरी, जि. बीड) याच्याविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. हा प्रकार ४ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२१ दरम्यान बी. ई. जी. सेंटर, खडकी येथे घडला आहे.

परसराम डोंगरे हा बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुपच्या रिलेशन भरतीसाठी आला होता. त्याचे वय मुळ कागदपत्रांनुसार जास्त असल्याने ते वय लपवून भरतीस पात्र होण्यासाठी त्याने त्यांची जन्मतारीख १ ऑगस्ट १९९७ असताना त्याने रिलेशन सर्टिफिकेटवर आपली जन्मतारीख २६ डिसेंबर २००२ अशी असल्याचे नमूद असणारे खोटे सर्टिफिकेट सादर करुन भारतीय सैन्य दलाची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक मगदूम तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Satara News | साताऱ्याच्या सुपुत्राला लडाखमध्ये वीरमरण

e-Shram पोर्टलला मिळतोय जबरदस्त प्रतिसाद ! आतापर्यंत 1 कोटी कामगारांनी केले रजिस्ट्रेशन; 38 कोटी कामगारांना होईल फायदा

SBI नं ग्राहकांना ‘त्या’ नंबर पासून केलं सावध, एका निष्काळजीपणामुळे बँक बॅलन्स होईल ‘झीरो’; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | Fraud of Bombay Engineering group by giving fake birth certificate in army recruitment; Incident at Vishrantwadi in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update