Satara News | साताऱ्याच्या सुपुत्राला लडाखमध्ये वीरमरण

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – सातारा जिल्ह्यातील (Satara News) वाई तालुक्यातील आसले गावच्या सुपुत्राला लडाखमध्ये वीरमरण (Heroism) आले. सोमनाथ मांढरे (Somnath Mandhare) असे या वीर जवानाचे नाव असून लडाखमधील (Ladakh) बर्फाच्छादित प्रदेशात प्रतिकूल वातावरणाशी लढताना त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ते बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने मिल्ट्रीच्या रुग्णालयात (Military Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण सातारा जिल्ह्यात (Satara News) शोककळा पसरली आहे.

सोमनाथ मांढरे यांची शुक्रवारी पहाटेपासून लडाख येथील प्रदेशात नेमणूक करण्यात आली होती. कर्तव्यावर असतानाच ते बेशुद्ध झाले. त्यामुळे त्यांना तात्काळ जवळच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यासंदर्भात सैन्य दलाकडून वाईचे तहसीलदार रणजीत भोसले (Tehsildar Ranjit Bhosale) यांना माहिती देण्यात आली.

तहसीलदार रणीत भोसले यांनी आसले येथील त्यांचे बंधू महेश मांढरे (Brother Mahesh Mandhare) यांना ही दु:खद घटना कळवली.
हुतात्मा जवान सोमनाथ मांढरे यांचे पार्थिव आज पहाटे दिल्लीत पोहोचेल.
त्यानंतर सायंकाळपर्यंत आसले या त्यांच्या मूळ गावी पोहोचेल व त्यांच्यावर शासकीय इतमामात आसले या गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मांढरे यांच्या पश्चात पत्नी, आठ वर्षाचा मुलगा आणि अवघ्या दहा महिन्यांची मुलगी व लहान भाऊ असा परिवार आहे.

Web Titel :- satara news | sataras son dies in ladakh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

SBI नं ग्राहकांना ‘त्या’ नंबर पासून केलं सावध, एका निष्काळजीपणामुळे बँक बॅलन्स होईल ‘झीरो’; जाणून घ्या

Almond Tea | लठ्ठपणापासून मधुमेहापर्यंत ‘या’ 4 आजारांवर रामबाण औषध आहे बदामचा चहा, जाणून घ्या कृती

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात लैगिंक अत्याचारातून एका 12 वर्षाच्या मुलीने दिला बाळाला जन्म