Pune Crime | एटीएम मशिन देण्याच्या बहाण्याने पुण्यातील नागरिकाची फसवणूक, 3 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मालकीच्या गाळ्यात एटीएम मशिन (ATM Machine) बसवण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 1 लाख 38 हजार रुपयांची फसवणूक (Cheating) केल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी परराज्यातील दोन महिलांसह तीन जणांवर पुण्यातील (Pune Crime) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 27 जुलै ते 28 ऑगस्ट 2021 या कालावधीत आंबेगाव पठार येथे घडला आहे.

 

प्रिया चौधरी Priya Chaudhary (रा.गाझीयाबाद, उत्तर प्रदेश), सपना कुमारी (Sapna Kumari), अनुज सिंह (Anuj Singh) यांच्या विरुद्ध फसवणूक आणि आयटी अॅक्ट (IT ACT) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजेंद्र गंगाराम पाध्ये Rajendra Gangaram Padhye (वय-51 रा.राजे चौक, आंबेगाव पठार) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti University Police Station) सोमवारी (दि.3) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र पाध्ये यांचे आंबेगाव पठार (Ambegaon Pathar) येथे स्वत:च्या मालकीचे गाळे आहेत. ते एटीएम सेंटर करीता भाड्याने देण्यासाठी गुगलवर सर्च करत होते. त्यावेळी त्यांना Hitachi या नामांकित कंपनीची माहिती एका लिंकवर मिळाली. फिर्यादी यांनी त्यांची सर्व वैयक्तिक माहिती भरली. त्यानंतर आरोपींनी त्यांना फोन करुन Hitachi कंपनीतून बोलत असल्याचे सांगून मेलवर कन्फरमेशन पत्र (Confirmation Letter) पाठवले.

 

आरोपींनी फिर्यादी यांना पुढील कार्यवाही करावी लागेल असे सांगून, रजिस्ट्रेशन फी (Registration Fee),
प्रोसेसिंग फी (processing Fee) च्या नावाखाली 16 हजार 500 रुपये व रिफंडेबल डिपॉझिट,
अॅग्रीमेंट, टीडीएस (TDS) अशी वेगवेगळी कारणे दाखवून त्यांना आणखी पैसे भरण्यास सांगून
त्यांची 1 लाख 38 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. मात्र, त्यानंतर एटीएम मशिन देखील मिळाली नाही.
त्यावरुन आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यावरुन त्यांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Fraud of Pune citizen under the pretext of giving ATM machine, FIR against 3 persons

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा