Pune Crime | अल्पवयीन मुलीला धमकावून केला लैंगिक अत्याचार, पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अल्पवयीन मुलीला धमकावून जबरदस्तीने लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केल्याची घटना पुण्यात (Pune Crime) उघडकीस आली आहे. आरोपीने मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिला त्रास देऊन मारहाण (Beating) केली. हा प्रकार 3 जानेवारी 2022 या कालावधीत हडपसर (Hadapsar News) येथील कॅनोल रोड लगत घडला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे.

 

हडपसर पोलिसांनी पीडीत मुलीच्या तक्रारीवरुन प्रथमेश वाघमारे Prathmesh Waghmare (रा. बनकर कॉलनी, हडपसर) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे (PSI Avinash Shinde) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने जून 2020 मध्ये पीडीत मुलीला धमकावून घरी घेऊन गेला. त्याठिकाणी तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर सोमवारी (दि.3) दुपारी 12 च्या सुमारास पीडीत मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत शाळेतून घरी जात होती. (Pune Crime)

फिर्यादी मुलगी घरी जात असताना आरोपीने तिला बोलायचे असल्याचे सांगून थांबवले. मात्र तिने नकार देऊन तेथून पळून जाऊन एका ठिकणी लपून बसली. आरोपीने तिचा शोध घेऊन ‘तू माझी आहे, माझी नाही झाली तर कोणाची होऊ देणार नाही’ असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. पोलिसांनी आरोपीच्या राहत्या घरी जाऊन शोध घेतला मात्र, तो सापडला नाही. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Minor girl threatened with sexual abuse, shocking incident in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bulli Bai App Case | ‘बुल्लीबाई’ प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई ! सिव्हिल इंजिनिअरिंगचा 21 वर्षीय विद्यार्थी ताब्यात

 

Pune Corona Updates | पुणे जिल्हा, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा बंद – अजित पवार

 

Pune Corona | अत्यंत चिंताजनक ! पुण्यात गेल्या 24 तासात 1100 पेक्षा जास्त कोरोनाचे नवे रूग्ण आढळले, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

ONGC CMD Alka Mittal | अलका मित्तल यांच्या हाती ONGC ची कमान ! एकेकाळी ‘ट्रेनी’ म्हणून ज्वाईन केली होती सर्वात मोठी ऊर्जा कंपनी, आता बनल्या CMD

 

Food-Medication Combination to Avoid | सावधान ! जर औषधासोबत करत असाल ‘या’ 6 गोष्टींचे सेवन तर आजच थांबवा, जाणून घ्या