Pune Crime | ‘प्रेमाचा चहा’ची रिलेटरशिप देऊन 1 कोटी 67 लाख रुपयांची फसवणूक; न्यायालयाच्या आदेशानुसार अमित मगर, स्वप्नील तुपेविरूध्द लोणीकाळभोरमध्ये FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | “प्रेमाचा चहा” (Premacha Chaha) या कंपनीच्या संचालक मंडळावर असताना परस्पर कंपनीच्या फ्रँचायझीचे महाराष्ट्र (Maharashtra), गुजरात (Gujarat), कर्नाटक (Karnataka), आंध्र प्रदेश (Andhra Pradesh), तेलंगणा (Telangana) या राज्यात वाटप केले. त्यांच्याकडून मिळालेली रक्कम स्वत:च्या बँक खात्यात स्वीकारुन खोटी कागदपत्रे (Fake Documents) तयार करुन कंपनीची १ कोटी ६७ लाख रुपयांची फसवणूक (Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

न्यायालयाच्या आदेशानुसार लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) तत्त्कालीन संचालक अमित गोरक्षनाथ मगर Amit Gorakshnath Magar (रा. डेफ्रोडील्स, मगरपट्टा सिटी, हडपसर – Hadapasar) आणि स्वप्निल बाळासाहेब तुपे Swapnil Balasaheb Tupe (रा. माळवाडी, हडपसर) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

याप्रकरणी सिद्धार्थ पंढरीनाथ भाडळे Siddharth Pandharinath Bhadale (वय ३८, रा. उरुळी देवाची, हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३८८/२२) फिर्याद दिली आहे. हा प्रकार १ फेब्रुवारी २०२१ ते ४ एप्रिल २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमाचा चहा याची पुणे शहरात व इतरत्र आऊटलेट आहेत. प्रेमाचा चहा प्रा. लि. (Premacha Chaha PVT. Ltd.) कंपनीवर आरोपी अमित मगर आणि स्वप्निल तुपे हे संचालक म्हणून काम करीत असताना कंपनीचा जीएसटी भरणा त्यांनी केला नाही. तसेच कंपनीचा आयकरही (Income Tax) भरला नाही. कंपनीच्या खात्यात जमा होणारी रक्कम परस्पर स्वत:च्या खात्यात वळती करुन अनाधिकृतपणे आऊटलेटचे वाटप केले. सोशल मीडियाचा ताबा स्वत:कडे ठेवली कंपनीचा रजिस्टर मोबाईल हा त्याचे प्रेमाचा चहा फुड प्रोडक्ट (Premacha Chaha Food Product) नावाने एलएलपी कंपनीच्या कामकाजाकरीता वापर करुन कंपनीचे नुकसान केले. (Pune Crime)

कंपनीच्या फेसबुक पेजवरुन (Facebook Page) ७ जून २०२१ रोजी फिर्यादी व विक्रांत भाडळे (Vikrant Bhadle) यांना कोणतीही पूर्व सूचना न देता अनाधिकृतीपणे रिमूव्ह केले. कंपनीने रिटेलरबरोबर केलेले लिखीत अग्रीमेंट गहाळ झाल्याचे खोटे सांगितले. या दोघा आरोपींना प्रेमाचा चहा प्रा. लि. कंपनीचे संचालकपदावरुन काढले. त्यांच्याकडे कंपनीचा कसल्याही प्रकाराचे अधिकारी नसताना त्यांनी संगनमत करुन आंध्र प्रदेश,
तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील रिटेलर यांना अनाधिकृतपणे
प्रेमाचा चहा नावाने फ्रँचायझीजचे वाटप करुन त्यांच्याकडून प्राप्त झालेली
रक्कम बँक खात्यात स्वीकारुन कंपनीचा अनाधिकृतपणे लोगोचा वापर करुन
कंपनीचा रजिस्टर मोबाईलची चोरी करुन कंपनीची दिशाभूल केली.
खोटी कागदपत्रे तयार करुन कंपनीची १ कोटी ६७ लाख रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून
पोलीस उपनिरीक्षक घोडके (Sub-Inspector of Police Ghodke) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Fraud of Rs 1 Crore 67 Lakh by providing relatorship of Premacha chaha;
FIR against Amit Magar, Swapnil Tupe in Lonikalbhor police station as per court order

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा