Pune Crime | कॉर्पोरेट ट्रेनिंग देणाऱ्या व्यावसायिक महिलेला फेसबुकवरील मैत्री पडली 30 लाखांना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune Crime) बोपोडी परिसरातील एका व्यावसायिक महिलेला फेसबुकवर अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करणे चांगलेच महागात पडले आहे. फेसबुकवरील ओळख झालेल्या व्यक्तीने महिलेला परदेशातून गिफ्ट पाठवल्याचे सांगून ते गिफ्ट सोडवून घेण्यासाठी 29 लाख 88 हजार रुपयांचा गंडा (fraud) घातल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पुण्यातील (Pune Crime) खडकी पोलीस ठाण्यात (Khadki police station) आयटी अ‍ॅक्टनुसार (IT Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

याबाबत 37 वर्षाच्या महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कॉर्पोरेट ट्रेनिंगचे ऑनलाइन प्रशिक्षण (corporate training Online training) देतात. एप्रिल 2021 मध्ये त्यांना एका व्यक्तीने फेसबुकवरुन (Facebook) संपर्क साधला. त्यांना कामाबाबत विचारणा करुन त्यांचा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक मागून घेतला.

संबंधित व्यक्तीने तो ब्रिटनमधील मँचेस्टर शहरात (Manchester City Britain) राहत असल्याचे सांगितले. स्वत: जनरल सर्जन असल्याचे सांगून त्याने महिलेचा विश्वास संपादन केला. दोघेही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून संपर्क करत होते. त्या वेळी आरोपीने त्यांना हॉस्पिटलची सर्व माहिती सांगून, त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना कॉर्पोरेट ट्रेनिंग घ्यायचे असल्याचे सांगितले. त्यासाठी फिर्यादी यांना सर्व कागदपत्रे पाठविण्यास सांगितले. पूर्ण, नाव, पत्ता देखील विचारुन घेतला. फिर्यादी यांनी ही सर्व माहिती व्हॉट्सअ‍ॅपवरुन आरोपीला दिली.

तक्रारदार यांना एप्रिल महिन्यात शेवटच्या आठवड्यात एका महिलेचा फोन आला.
दिल्लीतील कस्टम ऑफिसमधून (Custom office Delhi) बोलत असल्याचे तिने सांगितले.
तसेच गिफ्ट सोडवून घेण्यासाठी 47 हजार रुपयांची मागणी केली.
फर्यादीने आरोपीला कॉल करुन विचारणा केली त्यावेळी त्याने गिफ्ट पाठवल्याचे सांगितले.
त्यामुळे फिर्यादी यांनी महिलेने सांगितलेल्या बँक खात्यावर पैसे पाठवले.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी कस्टम विभागातून बोलत असल्याचे सांगून,
परदेशी चलन (Foreign currency) असल्याने 3 लाख 95 हजार रुपये दंड भरण्यास सांगितले.
त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादी महिलेकडून 29 लाख 88 हजार रुपये उकळले.
एवढी रक्कम भरून देखील गिफ्ट न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने सायबर सेल पोलिसांकडे (cyber cell police) तक्रार केली.
त्यानुसार गुन्हा (Pune Crime) दाखल करुन खडकी पोलिसांकडे (Khadki Police Station) वर्ग करण्यात आला.

Web Title :- Pune Crime | fraud of rs 29 lakh 88 thousand from facebook

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune MNS | अ‍ॅड. रुपाली पाटील यांची राज्याच्या महिला उपाध्यक्षपदावर वर्णी

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 187 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Kotak Mahindra Bank Stock | कोटक महिंद्रा बँकेने 20 वर्षात बनवले करोडपती, अवघे 20 हजार रुपये झाले सुमारे 2 कोटी