Pune Crime | अबब ! कोंढव्यात हुक्का पार्लरच्या साहित्याच्या गोदामात तब्बल 22 लाखाचा माल, पोलिसांकडून ‘कारवाई’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | राज्यशासनाने हुक्का पार्लर तसेच हुक्का (Hookah) साहित्याची विक्री करण्यास बंदी घातली आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी (Pune police) कोंढवा परिसरात असलेल्या एका हुक्का साहित्याच्या गोदामावर छापा टाकून 22 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक (Arrest) केली आहे. ही कारवाई (Pune Crime) कोंढवा (Kondhwa) परिसरातील येवलेवाडी येथील एका सोसायटीच्या तळमजल्यावर असलेल्या गोदामात केली.

 

शहेजाद अश्रफ रंगुनवाला Shehzad Ashraf Rangunwala (वय 37), नावेद मुन्ने खान Naved Munne Khan (वय 21), शफीक महंमद मालापुरी
Shafiq Mohammad Malapuri (वय 18, तिघे रा. लेक डिस्ट्रीक्ट सोसायटी, येवलेवाडी, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवलेवाडी (Yeolawadi) परिसरातील एका सोसायटीच्या परिसरात तळमजल्यावरील गोदामात हुक्का साहित्य
तसेच सुगंधी तंबाखुची साठवणूक करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य, सुगंधी सुपारी असा एकूण 22 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

Web Title : Pune Crime | Goods worth Rs 22 lakh in hookah parlor literature warehouse in Kondhwa, action by police kondhwa police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

MCED Recruitment 2021 | महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र इथे 100 जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर

Salman Khurshid | अयोध्येवरील पुस्तकावरून काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या घरावर दगडफेक आणि जाळपोळ

Mouni Roy | पांढऱ्या रंगाची बिकनी परिधान करुन स्विमींगपूलमध्ये उतरली मौनी राॅय; अभिनेत्रीच्या हॉट अ‍ॅन्ड बोल्ड अंदाजानं इंटरनेटवर लावली आग

Ahana Kumra | अभिनेत्रीचे गर्लफ्रेण्डसोबतचे बोल्ड फोटो पाहून युझर्सचे प्रश्न; म्हणाले – ‘ही अभिनेत्री समलैंगिक तर नाही ना?’

Chandrakant Patil | ‘भाजप-शिवसेना एकत्र येण्याची आमची इच्छाच नाही’ – चंद्रकांत पाटील