Salman Khurshid | अयोध्येवरील पुस्तकावरून काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या घरावर दगडफेक आणि जाळपोळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांच्या नैनीताल येथील घरावर दगडफेक आणि जाळपोळ झाल्याची माहिती स्वतः सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांनी फेसबूकद्वारे दिली आहे. एवढेच नाही, तर हल्ला करणाऱ्यांच्या हातात भाजपचा (BJP) झेंडा होता आणि ते सांप्रदायिक घोषणाबाजी करत होते, असे देखील त्यांनी सांगितले आहे.

 

माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद (Salman Khurshid) हे आपल्या ‘सनराइज ओव्हर अयोध्या’ (Sunrise Over Ayodhya) या पुस्तकावरून वादात सापडले आहेत. सलमान खर्शीद यांनी लिहिलेल्या या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना दहशतवादी संघटना ISIS (terrorist organization ISIS) आणि बोको हरामसोबत (Boko Haram) करण्यात आली आहे. तसेच हिंदुत्वाचे राजकारण धोकादायक असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

सलमान खुर्शीद यांनी फेसबूकवर (Facebook) घटनेचे फोटो शेअर करत हे हिंदुत्व असू शकत नाही, असे म्हणणारा मी अजूनही चूक आहे का? असा सवाल केला आहे. याअगोदर शाहजहांपूर येथे शनिवारी विश्व हिंदू परिषदेने (Vishva Hindu Parishad) सलमान खुर्शीद यांचा पुतळा जाळला होता. तसेच खुर्शीद यांची जीभ कापण्याची धमकी दिली होती. अशा लोकांना पाकिस्तानात (Pakistan) पाठवायला हवे, असे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी म्हटले होते.

 

Web Title : Salman Khurshid | controversy erupted over book ayodhya arson stone pelting salman khurshid house nainital

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mouni Roy | पांढऱ्या रंगाची बिकनी परिधान करुन स्विमींगपूलमध्ये उतरली मौनी राॅय; अभिनेत्रीच्या हॉट अ‍ॅन्ड बोल्ड अंदाजानं इंटरनेटवर लावली आग

Mayor Kishori Pednekar | किशोरी पेडणेकरांचा कंगनाला टोला; म्हणाल्या – ‘प्लास्टिकच्या घोड्यावर बसून सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री देणे हिंदुस्थानचा अपमान’

Ahana Kumra | अभिनेत्रीचे गर्लफ्रेण्डसोबतचे बोल्ड फोटो पाहून युझर्सचे प्रश्न; म्हणाले – ‘ही अभिनेत्री समलैंगिक तर नाही ना?’

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! आता सूर्यास्तानंतर शवविच्छेदन करण्याची परवानगी; 24 तासात कधीही होऊ शकणार Post-Mortem

Coronavirus | मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा बंगल्यात पुन्हा कोरोनाची ‘एन्ट्री’