Pune Crime | भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिला सामाजिक कार्यकर्त्याचा विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिला सामाजिक कार्यकर्त्याचा (Social Worker) विनयभंग (Molestation in Pune) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. ही घटना पुण्यातील (Pune Crime) वाडरवाडी येथील मॉडल कॉलनी येथे रविवारी (दि.19) घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने बुधवारी (दि.22) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) फिर्याद दिली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन एकावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

सिद्धार्थ लक्ष्मण कट्टीमणी Siddharth Laxman Kattimani (रा.गोखलेनगर, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 43 वर्षाच्या पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिला हे नात्यातील असल्याने एकमेकांना ओळखतात. रविवारी रात्री नऊच्या सुमारास महिलेच्या घरासमोर त्यांचा मुलगा, भाचा आणि त्यांचे मित्र एकत्र गप्पा मारत बसले होते. (Pune Crime)

त्यावेळी आरोपी सिद्धार्थ आणि एका महिलेने पीडित महिलेचा मुलगा, भाचा आणि त्यांच्या मित्रांना अश्लिल शिवीगाळ (Obscene swearing) करत आरडाओरडा केला. हा प्रकार समजल्यानंतर पीडित महिला भांडण सोडवण्यासाठी गेल्या. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या पोटात, मांडीवर आणि छातीवर लाथा मारुन जखमी केले. तसेच मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Harassment of a female social worker who went to settle a dispute

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा