Pune Crime | ऑडी कार दुरुस्तीसाठी दिली, त्याने चक्क टाकली विकून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ऑडी या आलिशान गाडीचे (Audi Car) क्लच प्लेट दुरुस्तीसाठी त्यांनी गाडी दिली असताना त्याने कारचा अपहार करुन ती परस्पर विकल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी पुष्पा सतीश जैन Pushpa Satish Jain (वय ५०, रा. फुलेनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४०५/२२) दिली आहे. त्यानुसार उत्कर्ष साळवे Utkarsh Salve (रा. राम सोसायटी, फुलेनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३ जानेवारीपासून आतापर्यंत घडला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या मालकीची ऑडी कारची क्लच प्लेट दुरुस्तीचे काम करण्यासाठी उत्कर्ष साळवे याच्याकडे दिली होती. त्याने कारचा अपहार करुन ती परस्पर विकली. त्याचे पैसेही परत केले नाही.
त्यांनी अनेकदा मागणी करुन त्यानी पैसे न दिल्याने शेवटी त्यांनी फसवणूकीची तक्रार केली असून पोलीस उपनिरीक्षक वारंगुळे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | He gave the Audi car for repair, he almost sold it

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा