Pune Pimpri Crime | धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून महिला डॉक्टरवर बलात्कार, डांबून ठेवत दिली जीवे मारण्याची धमकी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून एका बीएमएस महिला डॉक्टरवर (BMS Doctor) बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) सेल्स मॅनेजर असलेल्या आरोपीला बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. हा प्रकार 2019 ते 25 ऑगस्ट 2022 या कालावधीत संत तुकारामनगर (Pune Pimpri Crime) येथे घडला आहे.

 

पोलिसांनी आरोपी अजिम नुरमहंमद तांबोळी Azim Nurhammad Tamboli (वय-31 रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) याला अटक केली आहे. याप्रकरणी 26 वर्षीय पीडित महिलेने गुरुवारी (दि.25) पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी अजिम तांबोळी याच्यावर आयपीसी 376, 376(एन), 323, 504, 506, 427 अन्वये गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Crime)

 

सहायक पोलीस निरीक्षक अतुल शेटे (API Atul Shete) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही बीएमएस डॉक्टर आहे. तर आरोपी हा सेल्स मॅनेजर (Sales Manager) म्हणून काम करतो. आरोपीने प्रेमाचे नाटक करुन त्यांना लग्नाचे आमिष दाखवले. तसेच फिर्याद राहत असलेल्या घरी येऊन वारंवार शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. फिर्यादी यांनी लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण (Beating) केली. तसेच घरामध्ये डांबून ठेवत घराला बाहेरुन कुलुप लावले.

आरोपीने फिर्यादी यांना पोलिसांत तक्रार केली तर जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली.
दरम्यान 22 ऑगस्ट रोजी फिर्यादी या त्यांच्या क्लिनीकमध्ये गेल्या होत्या.
त्यावेळी आरोपीने त्याच्याकडे असलेल्या घराच्या चावीने घरात प्रवेश केला.
त्याने घरातील सामान अस्तव्यस्त फेकून देऊन घरातील वस्तूंची तोडफोड केल्याचे फर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अतुल शेटे करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Shocking! Doctor raped by marriage lure, threatened to kill; Accused Gajaad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा