Pune Crime | पोलीस अधिकाऱ्याच्या जागेत बिल्डरचे बेकायदा अतिक्रमण ! सुमेरु बिल्डकॉन प्रा. लि. च्या विजय रायकर यांच्यासह तिघांविरुद्ध FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जागेमध्ये असलेले कंपाउंड तोडून रस्ता खोदून ऑफिस बांधल्याप्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध सुमेरु बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड (Sumeru Buildcon Pvt.Ltd) या बांधकाम कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर (Managing Director) विजय रवींद्र रायकर (Vijay Ravindra Raikar,), श्रीकांत शेटे (Shrikant Shete) आणि गणेश पोकळे (Ganesh Pokale) यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुणे पोलीस (Pune Police) दलात कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक विजय दशरथ कदम PSI Vijay Dasharath Kadam (वय-57 रा. धनकवडी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय कदम हे पुणे पोलीस दलामध्ये विशेष शाखा (Special Branch) येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. विजय कदम यांचे वडील देखील पोलीस दलात कार्यरत होते. त्यांच्या वडिलांनी सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशातून धायरी (Dhayari) येथे 1990 मध्ये चार गुंठे जागा खरेदी केली होती. फिर्यादी यांच्या जागेजवळ वैष्णवी प्रमोटर्स आणि बिल्डर्स प्रा. लि. (Vaishnavi Promoters & Builders Pvt. Ltd.) यांनी 2005 मध्ये बांधकाम सुरु केले होते. त्यावेळी वैष्णवी प्रमोटर्स चे गणेश पोकळे यांनी फिर्यादी यांच्याकडे त्यांचे 4 गुंठे जमीनीची मागणी केली. या बदल्यात त्यांना शेवटचे प्लॉट देण्याचे ठरले होते. (Pune Crime)

गणेश पोकळे यांनी फिर्यादी यांचे प्लॉट घेऊन त्यांना त्या बदल्यात 20 फुटी रस्त्यासह गुंठेवारी नियमितीकरणाचा दाखला देऊन रजीस्टरी दस्त नोंद करुन कुंपन घालून फिर्यादी यांच्या ताब्यात दिला होता.
दरम्यान, एप्रिल 2021 मध्ये समेरु बिल्डकन या कंपनीने फिर्यादी यांच्या रस्त्यावर राडारोडा आणून टाकल्याचे समजले.
तसेच फिर्यादी यांचा जाण्या-येण्याचा रस्ता अडवून त्यावर त्यांचे ऑफिस बांधले होते.
याशिवाय फिर्यादी यांच्या प्लॉटमध्ये रस्ता तयार केला.
यानंतर फिर्यादी यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे (API Pratibha Tandle) करीत आहेत.

यासंदर्भात विजय कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,
गणेश पोकळे यांची अडचण समजून आम्ही त्यांना आमच्या प्लॉट दिला होता.
त्या बदल्यात दिलेल्या प्लॉटवर जाण्यासाठी दिलेला रस्ता अडवून त्याठिकाणी कार्यालय बांधले आहे.
तसेच 40 फूट खोल खड्डा खाणला आहे.
त्यामुळे नवज्योत अभा (Navjyot Abha) या नावाने निवासी इमारत बाधणाऱ्या सुमेरु बिल्डकन या कंपनी विरुद्ध तक्रार दिली आहे.

Web Title :- Pune Crime | illegal office building by encroaching on space crimes against three persons including vijay raikar of sumeru buildcon pvt ltd

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PM Kisan अंतर्गत खात्यात आली नसेल रक्कम तर काय करावे, कसे ट्रान्सफर होतील 2000 रुपये? जाणून घ्या

 

Earn Money | फक्त 70 हजार रुपये गुंतवून ‘हा’ व्यवसाय सुरू करून करा लाखोंची कमाई, सरकार देणार 30% अनुदान