Pune Crime | अंघोळ करण्यासाठी गेलेले 2 तरुण नदीत बुडाले

पुणे / दौंड : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | अंघोळ करण्यासाठी नदी पात्रात उतरलेल्या दोन तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. ही घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) दौंड येथील भीमा नदीपात्रात (bhima river) शनिवारी (दि.18) सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे. बुडालेल्या दोन तरुणांचे मृतदेह (two young died) तीन तासानंतर हाती लागले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी नदी तीरावर मोठी गर्दी केली होती.

आवेश मुजफ्फर शेख Awesh Muzaffar Sheikh (वय-13) आणि त्याचा सहकारी आदिल मेहबूब शेख Adil Mehboob Sheikh (वय-18) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
आवेश आणि आदिल हे आज सकाळी अकराच्या सुमारास भीमा नदीमध्ये अंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरले.
परंतु त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले.
दोन तरुण पाण्यात बुडत असल्याचे समजल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद घुगे (Police Inspector Vinod Ghuge),
पोलीस हवालदार सचिन बोराडे, अण्णा देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल रवी काळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक पोपट जाधव यांनी नदी तीरावर झालेली गर्दी बाजूला केली.
पोलिसांनी नावाडी मच्छिमार यांच्या मदतीने तरुणांचा शोध घेतला.

 

Web Title : Pune Crime | in bhima river two young man died at daund

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

GST Council | जीएसटी कौन्सिलचा निर्णय ! 1 जानेवारीपासून मंथली GST रिटर्न दाखल न केल्यास जमा करू शकणार नाही GSTR-1

Mild Products | आंघोळ करताना साबणाच्या फेसाने घेतला पेट, 4 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी; स्वस्त साबणाचा परिणाम

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 253 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी