Pune Crime | ‘सावकारी’, खंडणी अन् अपहरणाच्या गुन्ह्यात पुणे शहर पोलिस दलातील कर्मचार्‍यासह 6 जणांचा अटक, पोलीस दलात खळबळ

पुणे / शिरुर : पोलीसनामा ऑनलाइन – व्याजाने घेतलेल्या पैशाच्या मोबदल्यात जमीन नावावर करुन देण्यासाठी एकाचे अपहरण (Kidnapping) करुन मारहाण करत डांबून ठेवल्याची घटना पुण्यात (Pune Crime) उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरुर पोलिसांनी (Shirur police) आज (रविवार) सहा जणांना अटक (Arrest) केली असून यामध्ये पुणे शहर मुख्यालयातील (Pune Police headquarters) पोलीस कॉन्स्टेबलचा (Police Constable) समावेश आहे. अटक करण्यात (Pune Crime) आलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना 21 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी (police custody) सुनावण्यात आली आहे.

 

किरण सोपान भिल्लारे Kiran Sopan Bhillare (वय-35 रा. भिल्लारवाडी, कात्रज, पुणे), मनोज ज्ञानेश्वर भरगुडे Manoj Dnyaneshwar Bhargude (वय-32 रा. आंबेगाव फाटा, धनकवडी, पुणे), अनिल लक्ष्मण हगवणे Anil Laxman Hagwane (वय-33 रा. संभाजीनगर, धनकवडी), विशाल अनिल जगताप Vishal Anil Jagtap (वय-22 रा. भिल्लारवाडी, कात्रज), अभिजीत दत्तात्रय देशमुख Abhijeet Dattatraya Deshmukh (वय-30 रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), संदीप चंद्रकांत पोखरकर Sandeep Chandrakant Pokharkar (वय-24 रा. संभाजीनगर, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यामध्ये मनोज भरगुडे हा पुणे पोलीस मुख्यालयात पोलीस कॉन्स्टेबल आहे. तर रंजीत उर्फ बाजू पायगुडे (Ranjit alias Baju Payagude) हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी नितीन कैलास पवार Nitin Kailas Pawar (वय-33 रा. टाकळी हाजी, ता. शिरुर) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात (Shirur Police Station) फिर्याद दिली आहे.

 

काय आहे प्रकरण?
फिर्यादी यांनी अनिल हगवणे याच्याकडून व्यवसायासाठी मार्च 2018 मध्ये दरमहा 10 टक्के प्रमाणे 15 लाख रुपये घेतले होते. त्यावेळी हगवणे याने 500 रुपयांचा कोरा सही केलेला स्टॅम्प आणि 5 बँकेचे कोरे चेक घेतले होते. फिर्यादी यांनी आजपर्य़ंत 10 लाख 50 हजार रुपये व्याज दिले आहे. तसेच फिर्यादी यांनी आरोपी किरण भिलारे याच्याकडून देखील 9 लाख रुपये घेतले असून व्याजापोटी 60 हजार रुपये दिले आहेत.

आरोपी हगवणे आणि भिलारे यांनी मुद्दल आणि व्याजाच्या रकमेपोटी फिर्यादी यांच्याकडे 50 लाख रुपये मागितले.
पैसे दिले नाहीतर 5 एकर शेत जमीन लिहून देण्यासाठी तगादा लावला.
तसेच जमिन लिहून दिली नाहीतर पत्नी आणि मुलांना जिवे ठार मारण्याची धमकी (Threat) दिली.
शुक्रवारी (दि.17) आरोपींनी किरण भिलारे याची गाडी आणायची असल्याचे सांगून फिर्यादी यांना घरातून जबरदस्तीने गाडीत बसवून नेले.
त्यांना धनकवडी येथील शंकर महाराज मठ (Shankar Maharaj Math Dhankawadi) येथे आणले असता पोलीस कॉन्स्टेबल मनोज भरगुडे याने प्रकरण मिटवून टाक असे सांगत शिवीगाळ करुन मारहाण केली.
तसेच फिर्यादी यांना एका पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवल्याची तक्रार फिर्यादी यांनी शिरुर पोलीस ठाण्यात दिली.

 

शिरुर पोलिसांनी सहा आरोपींना आज अटक करुन न्यायालयात हजर केले.
न्यायालयाने आरोपींना 21 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपींच्या वतीने अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे (Adv. Vijaysinh Thombre) व अ‍ॅड.हितेश सोनार (Adv. Hitesh Sonar) यांनी काम पाहिले.
पुढील तपास शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पडळकर (PSI Hanumantha Padalkar) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | including pune policeman 6 arrested for money lending, kidnapping for ransom and kidnapping

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pathe Bapurao Puraskar | ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना ‘पठ्ठेबापूराव पुरस्कार’ जाहीर; लावणी गायिका व नृत्यांगना पुष्पा सातारकर आणि शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांचाही ‘गौरव’

Pune Crime | पुण्याच्या सांगवीमधील काटे पुरम चौकात योगेश जगतापचा 10 गोळ्या झाडून ‘गेम’ करणार्‍या 11 जणांवर FIR, पोलिसांकडून दोघांना अटक

Amit Shah Visit to Pune | अमित शहा यांची पुणे भेट; भाजपच्या पराभवाची कबुली – माजी आमदार मोहन जोशी