Pune Crime | खडकी अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी परिसरातून चंदनचोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहर आणि परिसरात रेकी करुन चंदन चोरी (Sandalwood Theft) करणाऱ्या आंतरराज्य टोळीला (Interstate Gang) गुन्हे शाखा युनिट चारच्या (Crime Branch Unit 4) पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. अटक (Arrest) करण्यात आलेल्या टोळीने खडकी अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी (Khadki Ammunition Factory) व परिसरात चंदनचोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून 1 लाखाचा तर चोरीचा मुद्देमाल विकत घेणाऱ्या कडून 1 लाख 52 हजार रुपये असा एकूण 2 लाख 87 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त (Pune Crime) केला आहे.

 

अक्षय आरडे, अंत्रोस पवार, अकिलाल पारधी, बियरलाल राजपुत (सर्व रा. कटनी, मध्यप्रदेश Madhya Pradesh) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांचे दोन साथिदार पळून गेले. चोरीचा मुद्देमाल विकत घेणारा आण्णा गायकवाड (रा. घोडेगाव ता. नेवासा, जि. अहमदनगर) यालाही अटक केली आहे. त्यांच्याकडून खडकी (Khadki Police Station), भारती विद्यापीठ (Bharati Vidyapeeth Police Station), चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या (Chatushringi Police Station) हद्दीतील 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. (Pune Crime)

 

अतिसंवेदनशिल संरक्षित क्षेत्र म्हणून ओळखले जाणाऱ्या खडकी अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी परिसरातून मोठ्या प्रमाणात चंदनाची झाडांची चोरी होत होती. याबाबत खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून युनिट चारच्या पथकाला देण्यात आल्या होत्या.

 

गुन्हे शाखा युनिट चार चे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. पेट्रोलींग दरम्यान पोलिसांना एका रिक्षामध्ये काही लोक बसून टेहाळणी करत असल्याचे दिसून आले. संशय आल्याने पोलिसांनी (Pune Police) चौकशी केली असता पळून जाण्याच्या तयारीत असताना चार जणांना ताब्यात घेतले. तर दोन जण फरार झाले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलीस कोठडी घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली. त्यावेळी आरोपींनी पुणे शहर व परिसरात फिरुन रेकी करुन चंदनाची झाडे तोडून चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी खडकी अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी व परिसरातील चंदनचोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

अटक करण्यात आलेल्या बियरलाल रजपतु याचेकडून 2 गुन्ह्यातील 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तर उर्वरित 7 गुन्ह्यातील मुद्देमाल आण्णा गायकवाड याला विकल्याचे सांगितले.
पथकाने गायकवाड याला नेवासा परिसरातुन ताब्यात घेऊन त्याच्याकडून 1 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गायकवाड हा सराईत चंदन तस्कर (Sandalwood Smuggler) असून त्याच्यावर गुजरात, नेवासा (Newasa Police Station),

सोनाई (Sonai Police Station), शिक्रापूर पोलीस ठाण्यात (Shikrapur Police Station) चंदन तस्करीचे गुन्हे दाखल आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर (Police Inspector Jayant Rajurkar),
पोलीस सहायक निरीक्षक विकास जाधव (API Vikas Jadhav), शोभा क्षिरसागर (API Shobha Khirsagar),
पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील (Jaydeep Patil), पोलीस अंमलदार महेंद्र पवार, राजस शेख, शितल शिंदे,
विनोद महाजन, संजय आढारी, स्वप्निल कांबळे, प्रविण भालचिम, नागेश कुंवर, विशाल शिर्के, सारस साळवी,
प्रविण कराळे, कौस्तुभ जाधव, सुरेंद्र साबळे, रमेश राठोड, अशोक शेलार, वैशाली माकडी यांच्या पथकाने केली.

 

Web Title :-  Pune Crime | Inter state gang stealing sandalwood from Khadki Ammunition Factory area nabbed by Pune Police Crime Branch

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

High Cholesterol झाल्यास शरीराराचा ‘हा’ भाग देतो 4 Warning Sign, चुकूनही करू नका दुर्लक्ष

 

Side Effects Of Turmeric | प्रमाणापेक्षा जास्त करू नका हळदीचे सेवन, ‘या’ आजारांना मिळेल निमंत्रण

 

Pune Crime | अंमली पदार्थाची विक्री करणारा नायजेरियन गुन्हे शाखेकडून गजाआड, 12 लाखाचे एम.डी. जप्त