High Cholesterol झाल्यास शरीराराचा ‘हा’ भाग देतो 4 Warning Sign, चुकूनही करू नका दुर्लक्ष

पोलीसनामा ऑनलाइन टीम – High Cholesterol Warning Sign | जेव्हा आपण आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे व्यायामासाठी वेळ काढू शकत नाही, तसेच जर आपण जास्त तेलकट पदार्थ खाल्ले तर आपल्या रक्तातील खराब कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते. वाढलेल्या कोलेस्टेरॉलमुळे उच्च रक्तदाब (High Blood Pressure), मधुमेह (Diabetes), हृदयविकाराचा झटका (Heart Attack), ट्रिपल वेसल डिसीज (Triple Vessel Disease) आणि कोरोनरी आर्टरी डिसीज (Coronary Artery Disease) चा धोका वाढतो (High Cholesterol Warning Sign).

 

कशी ओळखावी हाय कोलेस्टेरॉलची वॉर्निंग साईन?
शरीरातील खराब कोलेस्टेरॉल (Bad Cholesterol) चे प्रमाण केवळ रक्त तपासणीद्वारेच निश्चित केले जाऊ शकते, परंतु काहीवेळा अशा काही समस्या शरीरात वाढू लागतात ज्यामुळे आपल्याला या धोकादायक स्थितीचा संकेत मिळतो. जेव्हा कोलेस्टेरॉल वाढू लागते, तेव्हा आपल्या पायात वेदना वाढतात आणि हा सकेत ओळखणे फार महत्वाचे आहे कारण नंतर ते घातक ठरू शकते.

 

पायांकडून मिळणार्‍या या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष
1. हाय कोलेस्ट्रॉल (High Cholesterol) च्या स्थितीत आपल्या शरीरातील नसा ब्लॉक होऊ लागतात. हीच स्थिती शरीराच्या मज्जातंतूंमध्ये देखील होते, ज्यामुळे शरीराच्या सर्वात खालच्या भागात ऑक्सिजन पोहोचत नाही आणि पिंढर्‍यांमध्ये तीव्र वेदना होतात.

2. जेव्हा शरीरात वाईट कोलेस्टेरॉलची पातळी वाढू लागते, तेव्हा त्या व्यक्तीच्या पायात पेटके येऊ लागतात, रात्री झोपताना अनेक वेळा पायात तीव्र वेदना होतात, मात्र थोडावेळ उभे राहिल्यानंतर रक्तप्रवाह बरोबर होतो. आणि वेदना दूर करण्यास मदत करते. (High Cholesterol Warning Sign)

 

3. वाढत्या कोलेस्टेरॉलच्या सर्वात धक्कादायक लक्षणांपैकी एक म्हणजे पाय आणि नखे यांचा रंग बदलणे,
अनेकदा ते पिवळे होऊ लागतात. पायांना रक्तपुरवठा योग्य प्रकारे होत नसल्याने असे घडते.

 

4. हिवाळ्यात पायांना थंडी वाजणे सामान्य गोष्ट आहे, परंतु उन्हाळ्यात किंवा सामान्य तापमानातही पाय अचानक थंड होत
असतील तर हे धोक्याचे लक्षण आहे असे समजून तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :-  High Cholesterol Warning Sign | feet will give high cholesterol warning sign symptoms change of nail colour pain in leg cold sole

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | माहिती लपवून बँकेची केली पावणेसात कोटी रुपयांची फसवणूक; कमलेश बेताला याच्यावर गुन्हा दाखल

 

Bhabiji Ghar Par Hai | ’भाभी जी घर पर हैं’ मधील ‘मलखान’चे निधन, शूटींगला जाण्यापूर्वी क्रिकेट खेळताना घेतला अखेरचा श्वास

 

PAN Card स्मार्टफोनमध्ये असे डाऊनलोड करू शकतात यूजर्स, येथे जाणून घ्या पूर्ण पद्धत