Pune Crime | अंमली पदार्थाची विक्री करणारा नायजेरियन गुन्हे शाखेकडून गजाआड, 12 लाखाचे एम.डी. जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरात एम.डी. हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका नायजेरियन (Nigerian) नागरिकाला गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक एकने (Anti Narcotics Cell, Pune) अटक केली आहे. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीकडून 12 लाख 38 हजार 100 रुपये किमतीचे 82 ग्रॅम 540 मिलीग्रॅम वजनाचा एम.डी (MD) अंमली पदार्थ जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.22) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्पायरस कॉलेजकडे जाणाऱ्या (Pune Crime) रस्त्यावर केली.

 

चुकवुमेका केनेडी अन्यकोरा Chukwuemeka Kennedy Anyakora (वय-44 रा. खडकी रेल्वे स्टेशन जवळ -Khadki Railway Station, खडकी, मुळ रा. लगोस नायजेरिया) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मारुती पारधी (Maruti Pardhi) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chatushringi Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे पोलीस अधिकारी व कर्मचारी पेट्रोलींग करत होते. त्यावेळी ब्रेमन चौकाकडून स्पायरस कॉलेजकडे (Spiral College) जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर आरोपीने बेकायदेशीररित्या एमडी अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी जवळ बाळगल्याचे आढळून आले. त्याच्याकडून 12 लाख 38 हजार 100 रुपये किमतीचे 82 ग्रॅम 540 मिलीग्रॅम एम.डी., रोख रक्कम, मोबाईल असा एकूण 12 लाख 39 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर (API Shailaja Jankar) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Senior Police Inspector Vinayak Gaikwad),
सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dhengale), शैलजा जानकर,
पोलीस अंमलदार मारुती पारधी, मनोज साळुंके, संदिप जाधव, राहुल जोशी, पांडुरंग पवार, विशाल दळवी,
संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, रेहना शेख, संदेश काकडे, नितेश जाधव, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | 12 lakh MD drugs recover from the drug dealer Nigerian Pune Police Crime Branch Arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | माहिती लपवून बँकेची केली पावणेसात कोटी रुपयांची फसवणूक; कमलेश बेताला याच्यावर गुन्हा दाखल

 

Bhabiji Ghar Par Hai | ’भाभी जी घर पर हैं’ मधील ‘मलखान’चे निधन, शूटींगला जाण्यापूर्वी क्रिकेट खेळताना घेतला अखेरचा श्वास

 

PAN Card स्मार्टफोनमध्ये असे डाऊनलोड करू शकतात यूजर्स, येथे जाणून घ्या पूर्ण पद्धत