Pune Crime | ‘इतना खर्चा होता है, हमे कुछ पैसा कमाना होगा’ ! पतीनेच आपल्या पत्नीचे अश्लील फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करण्याची व तलाक देण्याची दिली धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | चारित्र्याचा संशय (Doubt On Character) घेऊन एका पतीनेच आपल्या पत्नीचे अश्लिल फोटो (Pornographic Photos) काढून ते इन्स्टाग्रामवर (Instagram) अपलोड करुन पैसे कमाऊ अशी ऑफर दिली. त्याचे ऐकले नाही तर तलाक (Talak) देईन, अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका २९ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली असून पोलिसांनी तिचा पती, सासू, सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पती तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ व मारहाण करीत असे. नोव्हेंबर २०२० पासून १६ एप्रिल २०२२ पर्यंत हा प्रकार सुरु होता. (Pune Crime)

 

त्याने फिर्यादी यांचे अश्लिल फोटो मोबाईलमध्ये काढले. त्यानंतर त्यांना म्हणाला की, ‘‘इतना खर्चा होता है, हमे कुछ पैसा कमाना होगा. मै तुम्हारे अश्लिल फोटो निकालुंगा और इन्स्टाग्रामपर अपलोड करके पैसे कमाऐंगे’’ असे बोलून प्रॉपर्टीच्या कागदावर सह्या कर नाही तर तुला तलाक देईल, अशी धमकी दिली. तिच्या सासू, सासरे, दीर यांनी लग्नात सामान दिले नाही, म्हणून टोमणे मारुन मारहाण करुन छळ केला, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | It costs so much we have to make some money Husband threatens to upload his wifes pornographic photos on Instagram and divorce her

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा