Pune Crime | संदीप मोहोळ खून प्रकरणात सचिन पोटेसह जमीर शेख, संतोष लांडेला जन्मठेप; गणेश मारणे, राहुल तारूसह इतरांची निर्दोष मुक्तता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | संदीप मोहोळ खून प्रकरणात (sandeep mohol murder case) पुण्यातील विशेष मोक्का न्यायालयाने (mcoca special court) अंतिम निकाल दिला आहे. खून प्रकरणातील आरोपी सचिन पोटे (Sachin Pote), जमीर शेख (Jamir Shaikh) आणि संतोष लांडे (Santosh Lande) यांना दोषी ठरविण्यात आले आहे. त्यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, गणेश निवृत्ती मारणे (Ganesh Nivrutti Marne), राहुल तारू (Rahul Taru), अनिल वाघमारे, निलेश मानगिरे यांच्यासह 10 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मोक्का कोर्टाचे न्यायाधीश ए.एन. सिरसिकर (Mocca Court Judge A .N. Sirsikar) यांनी हा निकाल दिला आहे.

संदीप मोहोळ यांचा 4 ऑक्टोबर 2006 रोजी पौड फाटा येथे गोळ्या घालून निर्घृण खून करण्यात आला होता. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यावेळी गणेश निवृत्ती मारणे, सचिन पोटे आणि इतर अशा एकुण 18 जणांना अटक केली होती. गुंड सचिन पोटे (Sachin Pote), जमीर शेख (Jamir Shaikh) व संतोष लांडे (Santosh Lande)अशी जन्म ठेपेची शिक्षा सुनावलेल्या तिघांची नावे आहेत. तर संजय कानगुडे, समीर उर्फ सम्या शेख, गणेश मारणे (Ganesh Nivrutti Marne), सचिन मारणे (Sachin Marne), राहुल तारू (Rahul Taru), अनिल खिलारे, विजय कानगुडे, शरद विटकर, निलेश माझीरे, राहील शेख अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी मोक्का, आर्म ऍक्ट, खून यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल होता.

याप्रकरणी पुणे पोलिसांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) गणेश मारणे याच्यासह एकूण 18 जणांवर गुन्हा दाखल केला होता.
पौड रोडवर दोन टोळ्यांमधून 4 ऑक्टोबर 2006 मध्ये हा खून झाला होता.
त्यानंतर पोलिसांनी 18 जणांना अटक देखील केली होती.
तपास पूर्ण करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केेले होते.
तेव्हापासून न्यायालयात हा खटला सुरू होता. न्यायालयात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद सुरू होता.
दोन्ही बाजूूूचे साक्षीदार तपासण्यात आले होते. गेल्या महिन्यात शेवटचा युक्तिवाद झाला होता.
न्यायालयाने 22 जुलै रोजी निकाल दिला आहे. त्यानुसार या तिघांना जन्म ठेपेची शिक्षा सुनावली आहे.
302, 149 आणि 34 मध्ये सचिन पोटे, जमीर शेख आणि संतोष लांडे यांना दोषी ठरवले आहे तर मोक्का आणि 120 (ब) मध्ये सचिन पोटे, जमीर शेख आणि संतोष लांडे यांना निर्दोष ठरवले आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्वला पवार (Adv. Ujwala Pawar) यांनी काम पाहिले, तर आरोपींच्या बाजूने अ‍ॅड. हर्षद निंबाळकर (Adv. Harshad Nimbalkar), अ‍ॅड. सुधीर शहा (Adv. Sudhir Shah), अ‍ॅड. संदीप पासबोला (Adv Sandeep Pasbola), अ‍ॅड. राहुल वंजारी (Adv Rahul Vanjari), अ‍ॅड. अतुल पाटील (Adv Atul Patil), अ‍ॅड. धैर्यशील पाटील (Adv Dhairyashil Patil), अ‍ॅड. सुरेशचंद्र भोसले (Adv, Suresh Chandra Bhosale), अ‍ॅड. जितेंद्र सावंत (Adv, Jitendra Sawant), अ‍ॅड. राहुल भरेकर (Adv. Rahul Bharekar), अ‍ॅड. विपूल दुशिंग (Adv. Vipul Dushing) यांनी या खटल्यात काम पाहिले आहे.

आरोपी राहुल रामचंद्र तारू या आरोपीचे वकिल म्हणून अ‍ॅड. संदीप पासबोला (Adv. Sandeep Pasbola), अ‍ॅड. राहुल वंजारी (Adv. Rahul Vanjari) आणि अ‍ॅड. अतुल पाटील (Adv. Atul Patil) यांनी काम पाहिले. पोलिसांनी सादर केलला सर्व पुरावा खोडून काढत वकिलांनी राहुल तारू याचा संदीप मोहोळ याच्या खुनाशी कसलाही संबंध नाही हे न्यायालयाला पटवून दिले.

 

Web Title :- Pune Crime | Jamir Sheikh and Santosh Lande sentenced to life imprisonment along with Sachin Pote in Sandeep Mohol murder case; Ganesh Marne acquitting with others including Rahul Taru

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IRCTC News : आता ऑनलाइन रेल्वे तिकिट बुकिंगपूर्वी करावे लागेल मोबाइल आणि ईमेल व्हेरिफिकेशन; जाणून घ्या

Pune Crime | कोंढवा पोलिसांकडून पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या भाजपच्या माजी नगरसेवक विवेक यादवला गुजरात बॉर्डरवरून अटक

Earthquake | बिकानेरमध्ये 24 तासात दुसर्‍यांदा भुकंपाचे झटके; पाकिस्तान होता केंद्रबिंदू, जीवितहानीचे अद्याप वृत्त नाही

Pimpri Crime | नवर्‍याबरोबर ठेवतेस तसे माझ्याबरोबरही संबंध ठेव; सासर्‍याने केली सुनेकडे शरीरसुखाची मागणी