Pune Crime | ‘माझ्यासोबत रिलेशन ठेव अन्यथा…’ भर रस्त्यात धमकी देत तरुणीचा विनयभंग; पुण्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | प्रेमसंबंध ठेवण्यासाठी (Love Affair) तरुणीचा पाठलाग करुन तिला धमकी देत विनयभंग (Molestation) केला. हा प्रकार (Pune Crime) बुधवारी (दि.14) दत्तनगर चौक ते आंबेगाव खुर्द (Ambegaon Khurd) दरम्यान दुपारी तीन ते पावणे चार यावेळेत घडला. याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

याबाबत 20 वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidhyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रवीण काकडे Praveen Kakade (वय-22 रा. केळवडे, ता. भोर) याच्यावर आयपीसी 354ड, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी चे प्रेमसंबंध होते.
याबाबत तरुणीच्या आई-वडिलांना समजल्यानंतर तिने प्रविण सोबत बोलणे बंद करुन संबंध तोडले होते. याचा राग आल्याने आरोपीने फिर्य़ादी तरुणीचा पाठलाग केला. तसेच तिचा हात पकडून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन फिर्यादी व त्यांच्या मैत्रिणीला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच ‘तु जर माझ्या सोबत रिलेशन मध्ये राहिली नाही तर मी तुला आयुष्यभर त्रास देईन व तुझ्या घरच्यांना मारुन टाकेन’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कथले करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | ‘Keep a relationship with me or else’… Incident in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shriya Pilgaonkar | श्रिया पिळगावकरची नवी वेब सिरीज चर्चेत; सिरीज मध्ये साकारणार सेक्स वर्करची भूमिका

Jitendra Awhad | ‘हे सरकार आहे की विवाह नोंदणी कार्यालय?’; जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर घणाघात

Pune Bhor News | विजेचा शॉक लागून 4 जणांचा मृत्यू; भोर तालुक्यातील दुर्दैवी घटना