Pune Crime | पुण्यात वाहतूक पोलिसावर कोयत्याने वार ! कात्रज चौकातील घटना, हल्ल्यात पोलिसासह दोघे जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | किरकोळ कारणावरुन सुरु असलेली भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या वाहतूक पोलीस शिपायावर (Pune Traffic Police) टोळक्याने कोयत्याने वार करुन जबर जखमी (Attempt To Kill) करण्याचा प्रकार कात्रज चौकात (Katraj Chowk) घडला. (Pune Crime)

 

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) कैफ आरिफ शेख (वय १८, रा. संतोषनगर, कात्रज) याला अटक केली आहे. त्याचबरोबर त्याचे मित्र आमन मुल्ला, संकेत व आणखी एका साथीदारावर खूनाचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी प्रितम माधव लोणकर (वय ३०, रा. लोणकर बिल्डिंग, कात्रजगाव) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना कात्रज चौकातील हॉटेल गणेश येथे गुरुवारी रात्री ८ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रितम लोणकर हा मित्रांबरोबर चहा पिण्यासाठी हॉटेल गणेश येथे गेला होता.
तेथे गाडी पार्क करीत असताना एका मुलाने त्यांच्याबरोबर वाद घालून शिवीगाळ केली.
तुला मी कोण आहे ते दाखवितो, असे म्हणून त्याने तेथे असलेल्या इतर साथीदारांना बोलावून आणले.
लोणकर यांना आमन मुल्ला व संकेत यांनी हाताने पकडून ठेवले. कैफ याने त्याच्याकडील लोणकर यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केला.
तो त्यांच्या उजव्या हाताचे करंगळीवर लागून ते जखमी झाले.
ही भांडणे पाहून चौकात वाहतूक नियमन करणारे पोलीस शिपाई मनोज बदडे हे धावत तेथे आले.
भांडणे सोडत असताना कैफ याने त्यांच्या हातावर कोयत्याने वार करुन त्यांना जखमी केले.
पोलिसांनी कैफ शेख याला अटक केली असून पोलीस निरीक्षक यादव तपास करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Knife attack on traffic police in Pune Incident at Katraj Chowk two injured along with police in attack

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा