Pune Crime | वाहनचोरी, घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांकडून अटक, 13 गुन्हे उघडकीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहर आणि परिसरात वाहन चोरी (Vehicle theft) व घरफोडी (Burglary) करणाऱ्याला अट्टल गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून 13 गुन्हे उघडकीस आणून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अब्दुल महंमद शेख (वय -19, रा.भारत नगर, कात्रज, पुणे) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी शेख हा पोलीस रेकॉर्डवरील (Pune Crime) गुन्हेगार आहे.

 

कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीत वाढत्या वाहन चोरी, जबरीच्या चोरीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांनी हद्दीत गस्त वाढवण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार कोंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथक (Investigation Team) हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार बनसूडे व मदन यांना माहिती मिळाली की, पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी हा इस्कॉन मंदिराजवळ (ISKCON Temple) थांबला आहे. पोलिसांनी सापळा रचून (Pune Crime) आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्याकडून जबरी चोरीचे 2, वाहन चोरीचे 6 आणि घरफोडीचे 5 गुन्हे असे 13 गुन्हे उघडकीस आणून 1 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 9, वानवडी (Wanwadi Police Station), चतुश्रुंगी (Chatushrungi Police Station), हडपसर (Hadapsar Police Station) आणि सासवड पोलीस ठाण्यातील (Saswad Police Stations) प्रत्येकी एक असे एकूण 13 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
पोलीस उपाआयुक्त परिमंडळ 5 श्रीकांत देशमुख (DCP Shrikant Deshmukh),
सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पौर्णिमा तावरे (ACP Poornima Taware),
पोलीस निरीक्षक संजय मोगले (Police Inspector Sanjay Mogle)
यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील (PSI Swapnil Patil),
अंमलदार चव्हाण, देसाई, पवार, चिनके, होळकर, बनसुडे, भोसले, मदन, शुक्ला यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | Kondhwa Police arrests a staunch criminal of vehicle theft, house burglary, 13 crimes busted

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uday Samant | आदिवासी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी फेब्रुवारीत ‘ट्रायबल इंडस्ट्रियल पार्क’ – उद्योगमंत्री उदय सामंत

Aaditya Thackeray | राहुल शेवाळेंच्या आरोपांवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले- ‘मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी आणि मुख्य…’

Raj Thackeray | सोशल मिडीया वापरावरून राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना खडे बोल; म्हणाले…