Pune Crime | केवायसी अपडेट करणे पडले महागात, ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाइन 8 लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एसबीआय बँकेचे (SBI Bank) केवायसी (KYC) माहिती अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) पुण्यातील (Pune Crime) एका ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन 8 लाख 70 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार पुण्यातील (Pune Crime) बाणेर येथे 5 मे 2021 रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी तक्रारदार यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

प्रकाश दुलादिनोमल असनानी Prakash Duladinomal Asnani (वय-68 रा. पॅनकार्ड क्लब रोड, बाणेर) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी रविंद्र सिंग Ravindra Singh (रा. पश्चिम बंगाल-West Bengal), सिताराम चौधरी Sitaram Chaudhary (रा. पश्चिम बंगाल), मेघाशॉर्टस इंटरनेट प्रा. लि. (Meghashorts Internet Pvt. Ltd.) चे शैलेशकुमार खेताभाई धारजी (Shailesh Kumar Khetabhai Dharji) यांच्यासह एका मोबाईल धारकावर आयटी अ‍ॅक्ट (IT Act) अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मोबाईलवर आरोपीने केवायसी अपडेट करण्याचा खोटा एसएमएस पाठवला. यामध्ये तक्रारदार यांच्या मोबाईलवर लिंक पाठवून क्लिक करण्यास सांगितले. सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांना फोन करुन ओटीपी घेऊन त्यांच्या बँक खात्यातून 8 लाख 70 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करुन आर्थिक फसवणूक (Cheating) केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे (Pune Police) तक्रार अर्ज केला. पोलिसांनी तक्रार अर्जाची चौकशी करुन शुक्रवारी (दि.31 मार्च) गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक गायकवाड (Police Inspector Gaikwad) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | KYC Update cheating of old man

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corporation | प्रशासकाच्या कार्यकाळातही महापालिकेच्या ‘वित्तिय समितीचे’ अस्तित्व कायम ! आयुक्तांनी पुढील आठवड्यात समितीच्या बैठकीचे केले आयोजन

 

PMC Gunthewari | पुणे महापालिकेने गुंठेवारीतील प्रस्ताव दाखल करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढविली

 

Dr. Bharati Pawar | मास्क मुक्तीला केंद्राचा विरोध; राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी स्पष्टच सांगितलं