Pune Crime | पिंपरीमध्ये गांजाचा मोठा साठा जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पिंपरी चिंचवडच्या (Pimpri Chinchwad) भुजबळ चौकात (Bhujbal Chowk) तब्बल 7 लाखाहून अधिक किंमतीचा 30 किलो गांजा (Marijuana) पकडण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या (Pimpri Chinchwad Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथकाने (anti narcotics cell) ही करावाई (Pune Crime) केली आहे. या प्रकरणी दोघांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

बाळू महादेव वाघमारे (वय-31 रा. म्हातोबा नगर झोपडपट्टी, वाकड), रवींद्र प्रकाश घाडगे (वय-23 रा.वाकड, मुळ रा. शिरपूर, जि. धुळे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस हवालदार प्रदीप शेलार (Police Constable Pradeep Shelar) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुजबळ चौकात दोघेजण प्रवासी बॅगमध्ये (travel bag) गांजा घेऊन आले असल्याची माहिती पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad Police) गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी भुजबळ चौकात जुना जाकात नाका येथून बाळू आणि रविंद्र यांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या प्रवासी बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये गांजा आढळून आला. पोलिसांनी 7 लाख 54 हजार 575 रुपये किंमतीचा 30 किलो 180 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
आरोपी वेगवेगळ्या प्रवासी बॅगेतून गांजा आणून त्याची विक्री (Puen Crime) करत होते.

 

Web Title : Pune Crime | Large stock of cannabis seized in Pimpri by pimpri chinchwad police crime branch of anti narcotics cell

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

R. Ashwin | T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये आर.अश्विनचे स्थान पक्के, ‘या’ दिग्गजानं दिली माहिती

Nana Patole | भाजपला गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का?, नाना पटोलेंचा संतप्त सवाल

High Cholesterol | वाढलेले कोलेस्ट्रॉल वेगाने नियंत्रणात आणतात ‘या’ गोष्टी, जेवणात करा समाविष्ट, जाणून घ्या

LPG Subsidy | फ्री एलपीजी कनेक्शनच्या नियमात मोठे बदल? तात्काळ जाणून घ्या सबसिडीचा नवीन नियम

Sangli District Bank Election | मंत्री विश्वजीत कदम यांना धक्का ! मावसभाऊ आमदार विक्रम सावंत यांचा पराभव