Pune Crime | खुन करुन फरार झालेल्या आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी केली अटक

लोणी काळभोर/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बेपत्ता झालेल्या तरुणाचा (Missing Youth) मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून (Found Dead Body) आला होता. तरुणाचा खून (Murder) करुन पुरावा नष्ट (Evidence Destroyed) करण्यासाठी मृतदेह मातीत पुरला होता. तरुणाचा शोध घेत असताना रविवारी (दि.20) हांडेवाडी येथील पाटील व्ह्यू सोसायटीजवळ (Patil View Society) मातीत अर्धवट पुरलेला मृतदेह आढळून आला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) गुन्हा (FIR) दाखल करुन आरोपीचा शोध सुरु केला. लोणी काळभोर पोलिसांनी 72 तासात या गुन्ह्याचा तपास करुन आरोपीला अटक (Pune Crime) केली आहे.

 

किरण रोहिदास हांडे Kiran Rohidas Hande (वय – 20 रा. उरुळी कांचन – Uruli Kanchan) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सतीश मोहन चव्हाण (Satish Mohan Chavan) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीचा शोध घेत असताना आरोपी सतीश चव्हाण हा सतत वास्तव्याचे ठिकाण बदलत होता. तसेच तो मोबाईल वापरत नसल्याने आरोपाचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान होते. पोलिस सीसीटीव्ही (CCTV) आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत होते.(Pune Crime)

आरोपी हांडेवाडी परिसरात येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर यांना समजली. पोलिसांनी हांडेवाडी परिसरात आरोपीचा शोध घेऊन अटक केली. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. किरण हांडे याच्यावर कुऱ्हाड आणि दगडाने वार करुन खुन करुन मृतदेह मोकळ्या जागेत पुरल्याची कबुली दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर (PSI Pramod Hambir) करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil), सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai), वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi), पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे (Police Inspector Subhash Kale) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर (API Raju Mahanor), पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, संतोष होले, पोलीस नाईक सुनिल नागलोत, श्रीनात जाधव, संभाजी देविकर, अमित साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल राजेश दराडे, बाजीराव विर, शैलेश कुदळे, निखील पवार, दिगंबर साळुंके, विश्रांती फणसे यांच्या पथकाने केली.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Loni Kalbhor police arrested the accused who escaped after committing murder

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा