Pune Crime | ओंकार उर्फ राण्या बानखेले खून प्रकरणाती आरोपी संतोष जाधवला आश्रय देणारा महाकाल उर्फ सिद्धेश कांबळे गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मंचर येथील सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ राण्या बाणखेले (Criminal Omkar alias Ranya Bankhele) याचा गोळ्या (Firing) घालून खून (Murder) करण्यात आला होता. याप्रकरणी संतोष सुनिल जाधव (Santosh Sunil Jadhav) व त्याच्या साथिदारांवर मंचर पोलीस ठाण्यात (Manchar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला होता. या गुन्ह्यातील फरार आरोपी संतोष जाधव याला आसरा देणाऱ्या महाकाल उर्फ सौरभ उर्फ सिद्धेश कांबळे (Mahakal alias Saurabh alias Siddhesh Kamble) याला पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) अटक केली आहे.

 

पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ उर्फ महाकाळ याला संगमनेर (Sangamner) जवळ अटक (Arrest) करण्यात आली आहे. सिद्धेश कांबळे याच्यावर याआधी मोक्का अंतर्गत कारवाई (MCOCA Action) Mokka करण्यात आली होती. त्याला अटक करुन न्यायालयात हजर केल्यावर 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.(Pune Crime)

 

ओंकार उर्फ राण्या बानखेले खून प्रकरणातील फरार आरोपी संतोष सुनिल जाधव याच्या विरुद्ध अटक वॉरंट (Arrest Warrant) काढण्यात आले होते. आरोपीचा शोध घेत असताना फरार आरोपीला सौरभ उर्फ सिद्धेश उर्फ महाकाल हिरामण कांबळे याने आसरा दिल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मंगळवारी (दि.7) मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) संगमनेर जवळ आरोपी सिद्धेश कांबळेला अटक केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh), अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे (Addl SP Mitesh Ghatte), उप विभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग सुदर्शन पाटील (Sub Divisional Police Officer Khed Division Sudarshan Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके (Local Crime Branch Police Inspector Ashok Shelke),
सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे (API Netaji Gandhare), सचिन काळे (API Sachin Kale),
पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे (PSI Ganesh Jagdale), पोलीस अंमलदार दिपक साबळे, राजू मोमीन,
सचिन घाडगे, विक्रम तापकीर, हनुमंत पासलकर, अजित भुजबळ, जनार्दन शेळके, महेश बनकर, अतुल डेरे,
चंद्रकांत जाधव, हेमंत विरोळे, प्रमोद नवले, संदिप वारे, योगेश नागरगोजे, अक्षय नवले, निलेश सुपेकर यांच्या पथकाने केली.

 

पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील हे करीत आहे.
त्यांना तपास कामात पोलीस निरीक्षक सतीश होडगर (Police Inspector Satish Hodgar),
सहायक पोलीस निरीक्षक कांबले (API Kamble), पृथ्वीराज ताटे (API Prithviraj Tate), सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहिते, वाफगावकर हे करीत आहेत.

 

Advt.

Web Title :- Pune Crime | Mahakal alias Siddhesh Kamble, who gave shelter to Santosh Jadhav, accused in Omkar alias Ranya Bankhele murder case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Price Today | कमॉडिटी बाजार ! सोने आणि चांदीचा भाव घसरला; जाणून घ्या

 

Pune Crime | दरमहा 10 टक्के व्याज उकळणारा खासगी सावकार गुन्हे शाखेकडून गजाआड

 

Samantha Ruth Prabhu | घटस्फोटानंतरही तुफान चर्चा ! बिकिनीत ‘या’ अभिनेत्रीचा बोल्ड लूक व्हायरल